10 हजारांच्या आत दमदार स्मार्टफोन; थक्क करणाऱ्या फीचर्ससह Tecno POP 6 ची एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: June 6, 2022 03:19 PM2022-06-06T15:19:44+5:302022-06-06T15:20:01+5:30
Tecno POP 6 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे फोन ड्युअल रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.
टेक्नोनं गेल्यावर्षी Tecno Pop 5 हा स्वस्त स्मार्टफोन लाँच केला होता. आता त्याची जागा घेण्यासाठी टेक्नोनं आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन Tecno POP 6 स्मार्टफोन लाँच केला आहे. सध्या हा हँडसेट नायजेरियामध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीचा इतिहास पाहता लवकरच Tecno POP 6 स्मार्टफोनची HD+ डिस्प्ले, Android 10 (Go Edition), 5-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि 5,000mAh च्या बॅटरीसह भारतात देखील एंट्री होऊ शकते.
Tecno POP 6 चे स्पेसिफिकेशन्स
Tecno POP 6 स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो HD+ अर्थात 720 x 1560 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. टेक्नोच्या लेटेस्ट POP 6 स्मार्टफोनमध्ये क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याचा क्लॉक स्पीड 1.3GHz इतका आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन Android 11 (Go edition) सह येतो.
फोटोग्राफीसाठी टेक्नोच्या या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनच्या फ्रंटला देखील फ्लॅश देण्यात आला आहे. हँडसेटच्या मागे 5MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, जो LED फ्लॅशसह येतो. Tecno POP 6 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसह 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 4.2, GPS, आणि 3.5mm ऑडिया जॅकची कनेक्टिव्हिटी मिळते.
Tecno POP 6 ची किंमत
Tecno POP 6 स्मार्टफोनची किंमत नायजेरिया मध्ये 130 डॉलर्स (सुमारे 10,000 रुपये) आहे. हा फोन सी ब्लू, स्काय ब्लू आणि लाइम ग्रीन कलरमध्ये लाँच झाला आहे.