आधीच स्वस्त असलेला फोन आणखी स्वस्त! 11GB रॅम, 7000mAh बॅटरी असलेल्या हँडसेटवर मोठी सूट  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:27 PM2022-06-27T16:27:03+5:302022-06-27T16:27:37+5:30

Tecno Pova 3 स्मार्टफोन 7000mAh बॅटरी, 11GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  

tecno pova 3 is available with 2000 rupees discount in first sale   | आधीच स्वस्त असलेला फोन आणखी स्वस्त! 11GB रॅम, 7000mAh बॅटरी असलेल्या हँडसेटवर मोठी सूट  

आधीच स्वस्त असलेला फोन आणखी स्वस्त! 11GB रॅम, 7000mAh बॅटरी असलेल्या हँडसेटवर मोठी सूट  

googlenewsNext

Tecno Pova 3 स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतीयांच्या भेटीला आला आहे. कमी किंमतीत मोठी बॅटरी असलेला हँडसेट म्हणून या स्मार्टफोननं अनेकांचं लक्ष वेधलं. आता या स्मार्टफोनची विक्री सुरु झाली आहे. 7000mAh बॅटरी, 11GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झालेला Tecno Pova 3 आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.  

किंमत आणि डिस्काउंट 

Tecno Pova 3 स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम व 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. आजच्या सेलमध्ये फोन बँक ऑफर्स अंतगर्त 2 हजार रुपयांपर्यंतच्या के इन्स्टंट डिस्काउंटसह विकत घेता येईल. 

Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन्स  

टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंचाची FHD+ LCD स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आली आहे. MediaTek Helio G88 प्रोसेसरची ताकद कंपनीनं या बजेट स्मार्टफोनला दिली आहे. सोबत 6GB पर्यंत रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळून एकूण 11GB रॅमची ताकद देण्यात आली आहे. फोन 128GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात येईल. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.  

Tecno Pova 3 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चे दोन ऑक्सिलरी सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच फोनमध्ये 8MP चा सेल्फी शूटर कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर तर मिळतात परंतु सोबत साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टिरियो स्पीकर देखील देण्यात आले आहेत. यातील 7000mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 48 तास वापरता येते, असा दावा करण्यात आला आहे. 

Web Title: tecno pova 3 is available with 2000 rupees discount in first sale  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.