अत्यंत कमी किंमतीत दोन दिवसांचा बॅकअप देणारी बॅटरी; रेडमी-रियलमीच्या डोकेदुखीत वाढ  

By सिद्धेश जाधव | Published: June 10, 2022 05:48 PM2022-06-10T17:48:30+5:302022-06-10T17:49:32+5:30

Tecno Pova 3 स्मार्टफोन 7000mAh बॅटरी, 11GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह भारतात लाँच होणार आहे.  

Tecno pova 3 teaser page live on amazon india launch soon  | अत्यंत कमी किंमतीत दोन दिवसांचा बॅकअप देणारी बॅटरी; रेडमी-रियलमीच्या डोकेदुखीत वाढ  

अत्यंत कमी किंमतीत दोन दिवसांचा बॅकअप देणारी बॅटरी; रेडमी-रियलमीच्या डोकेदुखीत वाढ  

googlenewsNext

Tecno Pova 3 स्मार्टफोन आता भारतात येणार हे कन्फर्म झालं आहे. कंपनीनं हा फोन अ‍ॅमेझॉनवरून टीज केला आहे. जेव्हा जागतिक बाजारात या 7000mAh ची बॅटरी असलेल्या फोनची एंट्री झाली होती तेव्हापासून याच्या भारतीय लाँचची वाट चाहते बघत होते. फिलिपिंसमध्ये हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात आला होता. त्यामुळे Amazon इंडियाच्या माध्यमातून Tecno Pova 3 देखील बजेट फ्रेंडली किंमतीत लवकरच लाँच होईल अशी अपेक्षा आहे.  

Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन्स 

टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंचाची FHD+ LCD स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आली आहे. MediaTek Helio G88 प्रोसेसरची ताकद कंपनीनं या बजेट स्मार्टफोनला दिली आहे. सोबत 6GB पर्यंत रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळून एकूण 11GB रॅमची ताकद देण्यात आली आहे. फोन 128GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात येईल. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.  

Tecno Pova 3 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चे दोन ऑक्सिलरी सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच फोनमध्ये 8MP चा सेल्फी शूटर कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर तर मिळतात परंतु सोबत साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टिरियो स्पीकर देखील देण्यात आले आहेत. यातील 7000mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 48 तास वापरता येते, असा दावा करण्यात आला आहे.  

Web Title: Tecno pova 3 teaser page live on amazon india launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.