स्वस्त 5G Phone! 6000mAh बॅटरी, 11GB RAM ची ताकद; Xiaomi-Realme च्या अडचणी वाढणार 

By सिद्धेश जाधव | Published: December 31, 2021 03:59 PM2021-12-31T15:59:56+5:302021-12-31T16:00:03+5:30

Tecno POVA 5G Phone: Tecno POVA 5G स्मार्टफोनसह कंपनी TWS इयरबड्स, स्पिकर आणि स्मार्टवॉच देखील भारतात लाँच करणार आहे. हा फोन पुढील महिन्यात सादर केला जाईल.

Tecno pova 5g Phone to launch in india under rs 20000 in late january  | स्वस्त 5G Phone! 6000mAh बॅटरी, 11GB RAM ची ताकद; Xiaomi-Realme च्या अडचणी वाढणार 

स्वस्त 5G Phone! 6000mAh बॅटरी, 11GB RAM ची ताकद; Xiaomi-Realme च्या अडचणी वाढणार 

googlenewsNext

5G Phone ची वाढती मागणी पाहून Tecno नं आपला पहिला 5G स्मार्टफोन Tecno POVA 5G लाँच केला आहे. जागतिक बाजारात आलेला हा फोन आता भारतात येणार आहे. कंपनीच्या सीईओनी फक्त या फोनच्या भारतीय लाँच टाइमलाईनची माहिती दिली नाही तर किंमत देखील सांगितली आहे.  

GizNext ला दिलेल्या मुलाखतीत Transsion India चे CEO Arijeet Talapatra यांनी Tecno POVA 5G फोन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात येईल, असं सांगितलं आहे. तसेच हा डिवाइस 18,000-20,000 रुपयांच्या आत सादर केला जाईल. स्मार्टफोनसह कंपनी TWS इयरबड्स, स्पिकर आणि स्मार्टवॉच देखील लाँच करणार आहे.  

Tecno POVA 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Tecno POVA 5G मध्ये 6.95 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वर लाँच केला गेला आहे. पंच-होल डिजाईनसह येणारा हा फोन 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित हायओएसवर चालतो. या फोनला मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत 8GB वेगवान LPDDR5 RAM आणि 128GB लेस्टस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. या फोनमधील 3 जीबी व्हर्च्युअल रॅममुळे एकूण रॅम 11 जीबी करता येतो.   

फोटोग्राफीसाठी Tecno POVA 5G च्या मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिगसाठी यात 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटीसह साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी या टेक्नो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.   

हे देखील वाचा:

WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर

एका क्लिकमध्ये झक्कास सेल्फी; Vivo V23e फोन करणार 44MP फ्रंट कॅमेऱ्यासह एंट्री

Web Title: Tecno pova 5g Phone to launch in india under rs 20000 in late january 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.