6000mAh बॅटरी, 11GB रॅमसह आला फाडू 5G SmartPhone; रेडमी-रियलमीची करणार सुट्टी!
By सिद्धेश जाधव | Published: February 8, 2022 03:09 PM2022-02-08T15:09:17+5:302022-02-08T15:09:39+5:30
Tecno POVA 5G SmArtphone: Tecno POVA 5G भारतात 11GB RAM, 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि Android 11 ओएससह सादर करण्यात आला आहे.
Tecno नं आज आपला पहिला 5G Smartphone भारतात सादर केला आहे. गेले कित्येक दिवस बातम्यांमध्ये झळकणारा Tecno Pova 5G आज बाजारात उतरवण्यात आला आहे. यात 11GB RAM, 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि Android 11 ओएस देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात 11 5जी बँड सपोर्ट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया किंमत आणि स्पेक्स
Tecno POVA 5G Price In India
Tecno POVA 5G ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते. हा फोन एथर ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. तुम्ही हा हँडसेट 14 फेब्रुवारीपासून अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या टेक्नो स्मार्टफोनच्या खरेदीवर 1,999 रुपयांची एक पावर बँक मोफत देण्यात येईल.
Tecno POVA 5G चे स्पेसिफिकेशन्स
Tecno POVA 5G मध्ये 6.9 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वर लाँच केला गेला आहे. पंच-होल डिजाईनसह येणारा हा फोन 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 8.0 वर चालतो. या फोनला मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत 8GB वेगवान LPDDR5 RAM आणि 128GB लेस्टस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. या फोनमधील 3 जीबी व्हर्च्युअल रॅममुळे एकूण रॅम 11 जीबी करता येतो.
फोटोग्राफीसाठी Tecno POVA 5G च्या मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 13MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP चा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटीसह साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी या टेक्नो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.
हे देखील वाचा:
Samsung करणार कमाल! बजेट सेगमेंट Galaxy A13 4G घेणार दमदार एंट्री; स्पेक्स झाले लीक