अरे वा! 6000mAh ची दणकट बॅटरी असलेला फोन येतोय, अनेक दिवस टिकेल Tecno Pova Neo चा बॅकअप 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 07:00 PM2022-01-13T19:00:58+5:302022-01-13T19:01:12+5:30

Tecno Pova Neo 6GB RAM, 6000mAh बॅटरी आणि 8MP सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात येऊ शकतो. या फोनच्या लाँचची घोषणा कंपनीनं सोशल मीडियावरून केली आहे.

Tecno pova neo to be launched in india soon with 6000mah battery and 6GB ram  | अरे वा! 6000mAh ची दणकट बॅटरी असलेला फोन येतोय, अनेक दिवस टिकेल Tecno Pova Neo चा बॅकअप 

अरे वा! 6000mAh ची दणकट बॅटरी असलेला फोन येतोय, अनेक दिवस टिकेल Tecno Pova Neo चा बॅकअप 

Next

Tecno जागतिक बाजारात सादर केलेली Pova सीरीज भारतात आणण्याची घोषणा केली आहे. कंपनी लवकरच Tecno Pova Neo लाँच करणार असल्याचं कंपनीच्या सोशल मीडियावरून समजलं आहे. निश्चित अशी तारीख मात्र अजूनही समजली नाही. हा फोन काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात 6GB RAM, 6000mAh बॅटरी आणि 8MP सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला होता.  

Tecno Pova Neo चे स्पेक्स   

टेक्नो पोवा नियोमध्ये 6.8 इंचाचा लार्ज एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या नवीन टेक्नो फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.   

Tecno Pova Neo स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 वर चालतो. हा बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणार ड्युअल सिम फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.   

पॉवर बॅकअपसाठी नवीन टेक्नो पोवा नियो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ही या फोनची खासियत आहे. हा डिवाइस 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच नॉर्मल युज केल्यास एकापेक्षा जास्त दिवस हा फोन वापरता येईल, असा दावा टेक्नो मोबाईल कंपनीनं केला आहे. हा फोन नायजेरियामध्ये NGN 75,100 अर्थात 13,800 रुपयांमध्ये सादर झाला आहे.   

हे देखील वाचा:

तुम्हाला ताप आहे कि नाही सांगणार स्मार्टवॉच; ब्लड प्रेशरची देखील घेणार काळजी, 8 दिवसांचा बॅटरी बॅकअप

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

Web Title: Tecno pova neo to be launched in india soon with 6000mah battery and 6GB ram 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.