11 जूनला येत आहे सर्वात स्वस्त 48MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन; यात असेल 6,000mAh ची मोठी बॅटरी  

By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2021 12:55 PM2021-06-07T12:55:37+5:302021-06-07T12:56:40+5:30

Tecno Spark 7T Launch: Tecno कंपनीने ट्विट करून Tecno Spark 7T स्मार्टफोनच्या लाँचची तारीख सांगितली तसेच अमेझॉनवरील लिस्टिंग देखील शेअर केली आहे.  

Tecno spark 7t to launch in india on june 11 with 48mp camera 6000mah battery  | 11 जूनला येत आहे सर्वात स्वस्त 48MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन; यात असेल 6,000mAh ची मोठी बॅटरी  

Tecno Spark 7T अमेझॉन एक्सक्लूसिव डिवाइस असेल.

Next

Tecno कंपनी लो बजेटमध्ये चांगले फीचर्स असलेले फोन्स लाँच करण्यासाठी ओळखली जाते. आता हि कंपनी अजून एक नवीन फोन भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. हा फोन Tecno Spark 7T नावाने लाँच केला जाईल. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून फोनच्या लाँचची तारीख 11 जून असेल, असे सांगितले आहे. 

कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या नवीन हँडसेटच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. Tecno Spark 7T अमेझॉन एक्सक्लूसिव डिवाइस असेल. अमेझॉनवरील माइक्रोसाइटमुळे लाँचपूर्वी स्पार्क 7T डिजाइनचा पण खुलासा झाला आहे. हा फोन 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल, अशी चर्चा आहे.  

Tecno Spark 7T ची डिजाइन 

अमेझॉन माइक्रोसाइटवरील फोटोजनुसार, Tecno Spark 7T वाटर-ड्रॉप नॉच डिस्प्लेसह येईल. फोनच्या मागे ड्युअल-कॅमेरा सेटअप असेल. हा डिवाइस तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.  

Tecno Spark 7T चे स्पेसिफिकेशन 

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, स्पार्क 7T मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले HD+ 720×1600 पिक्सल रेजोल्यूशनसह येईल. हँडसेटमध्ये एक ऑक्टा-कोर चिपसेट असेल. स्मार्टफोन 4GB रॅमसह येण्याची शक्यता आहे. तसेच, यात 64GB इंटरनल स्टोरेज देखील असू शकते.  

त्याचप्रमाणे, स्पार्क 7T Android 11 वर आधारित HiOS v7.6 UI वर चालेल. वर सांगितल्याप्रमाणे, डिवाइसमध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप असेल. फोनमध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा असल्याची माहिती देण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी असेल. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मागील बाजूस देण्यात येईल.  

Web Title: Tecno spark 7t to launch in india on june 11 with 48mp camera 6000mah battery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.