6,000mAhची मोठी बॅटरी असलेला किफायतशीर फोन Tecno Spark 7T, येईल लवकरच भारतात
By सिद्धेश जाधव | Published: June 5, 2021 01:15 PM2021-06-05T13:15:31+5:302021-06-05T13:16:11+5:30
Tecno Spark 7T launch: Tecno Spark 7T मध्ये 4 जीबी रॅम, 48MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी आहे.
Tecno कंपनी नेहमीच कमी किंमतीत लो बजेटमध्ये फोन्स लाँच करत असते. हे फोन्स कमी किंमतीत पण चांगल्या फीचर्ससह येतात. आता कंपनी Tecno Spark 7 सीरीजमध्ये लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, ज्याचे नाव Tecno SPARK 7T असेल. यापूर्वी या सीरीजअंतगर्त Tecno Spark 7, Tecno Spark 7 Pro आणि Tecno Spark 7P हे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. (Tecno spark 7t will soon launch in India in low budget phone category)
Tecno Spark 7T ची लाँच डेट समोर आली नाही परंतु लवकरच भारतात हा फोन लाँच केला जाईल. हा फोन लाँच होण्यापूर्वीच याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा फोन 6.52 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह येईल. तसेच, फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळेल. टेक्नोच्या या आगामी फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. पावर बॅकअपसाठी Tecno Spark 7T मध्ये 6,000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात येईल.
या सिरीजमधील Tecno Spark 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स
टेक्नो स्पार्क 7 प्रोमध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. हा फोन Android 11 आधारित HiOS 7.5 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. Tecno Spark 7 Pro 4 जीबी व 6 जीबी रॅम आणि 64 जीबी व 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, यात मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी आहे.