कमी किंमतीत भन्नाट स्पेसिफिकेशन्ससह Tecno Spark 8 येणार भारतात; पुढील आठवड्यात होऊ शकतो लाँच
By सिद्धेश जाधव | Published: September 7, 2021 11:57 AM2021-09-07T11:57:14+5:302021-09-07T12:03:10+5:30
Tecno Spark 8 India Launch: Tecno Spark 8 स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात सादर केला जाऊ शकतो. Android 11 Go Edition वर चालणार हा फोन मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो.
गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सादर झालेला Tecno Spark 8 स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. Tecno Spark 7 चा हा अपग्रेड व्हर्जन याआधी नायजेरियात सादर झाला आहे. आता GSMArena ने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने या फोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार हा फोन पुढील आठवड्यात भारतात सादर केला जाऊ शकतो. जागतिक लाँचमुळे स्पेसिफिकेशन्स जरी समजले असले तरी Tecno Spark 8 च्या भारतीय किंमतीची माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
Tecno Spark 8 चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 8 एक अँड्रॉइड गो स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉइड 11 गो व्हर्जनवर चालतो. ही गुगलची एक हलकी ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यामुळे या फोनमध्ये कमी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने 2GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच हा टेक्नो स्मार्टफोन मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेट वर चालतो.
टेक्नो स्पार्क 8 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन, 480nits ब्राईटनेस आणि 269ppi पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो. या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 16MP चा मुख्य सेन्सर आणि एक क्यूवीजीए लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 8 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 8 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Tecno Spark 8 ची किंमत
नायजेरियात Tecno Spark 8 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट आला आहे. 2GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 55,000 Nigerian Naira मध्ये विकत घेता येईल. ही किंमत 9,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.