शानदार फीचर्ससह स्वस्त स्मार्टफोन भारतात सादर; 5,000mAh बॅटरीसह Tecno Spark 8 देशात लाँच
By सिद्धेश जाधव | Published: September 13, 2021 04:22 PM2021-09-13T16:22:03+5:302021-09-13T16:27:48+5:30
Tecno Spark 8 Price in India: Tecno Spark 8 स्मार्टफोन फक्त एकाच व्हेरिएंटसह भारतात आला आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
टेक्नो ब्रँड बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये चांगले फीचर्स देण्यासाठी ओळखला जातो. आज देखील Tecno ने आपली ओळख कायम ठेवत एक नवीन हँडसेट लाँच केला आहे, ज्याचे नाव Tecno Spark 8 आहे. हा फोन गेल्या महिन्यात जागतिक बाजारात सादर करण्यात आला होता. भारतात मात्र या फोनमध्ये हेलीयो पी22 च्या जागी हेलीयो ए 25 प्रोसेसर दिला आहे. या फोनचे इतर स्पेक्स मात्र जागतिक व्हेरिएंटसारखे आहेत.
Tecno Spark 8 चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 8 एक अँड्रॉइड गो स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉइड 11 गो व्हर्जनवर चालतो. ही गुगलची एक हलकी ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यामुळे या फोनमध्ये कमी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने 2GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच हा टेक्नो स्मार्टफोन मीडियाटेकच्या हीलियो ए25 चिपसेटवर चालतो.
टेक्नो स्पार्क 8 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन, 480nits ब्राईटनेस आणि 269ppi पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो. या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 16MP चा मुख्य सेन्सर आणि एक क्यूवीजीए लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 8 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 8 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Tecno Spark 8 ची किंमत
Tecno Spark 8 स्मार्टफोन फक्त एकाच व्हेरिएंटसह भारतात आला आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. टेक्नो स्पार्क 8 स्मार्टफोन अटलांटिक ब्लू, फिरोजा सियान आणि आयरिश पर्पल कलर ऑप्शनमध्ये 15 सप्टेंबर खरेदीसाठी उपलब्ध होईल.