रिचार्जच्या किंमतीत Smartphone; इतक्या स्वस्तात मिळतोय 6GB RAM असलेला Tecno Spark 8C
By सिद्धेश जाधव | Published: February 24, 2022 07:46 PM2022-02-24T19:46:03+5:302022-02-24T19:46:30+5:30
Tecno Spark 8c Price In India: Tecno Spark 8c मध्ये 6GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
Tecno Spark 8c Price In India: टेक्नोनं काही दिवसांपूर्वी स्वस्तात 6GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 90Hz रिफ्रेश रेट असलेला Tecno Spark 8C हँडसेट लाँच करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आजपासून हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनवरील ऑफर्स अशा आहेत कि तुम्ही फक्त 400 रुपये देऊन विकत घेऊ शकता. पुढे आम्ही Tecno Spark 8C ची किंमत, लाँच ऑफर, स्पेसिफिकेशन आणि फीचर्सची माहिती दिली आहे.
Tecno Spark 8C ची किंमत आणि ऑफर्स
Tecno Spark 8C चा एकमेव 3 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा फोन अॅमेझॉन इंडियावरून Magnet Black, Iris Purple, Diamond Grey आणि Turquoise Cyan कलरमध्ये विकत घेता येईल. अॅमेझॉनकडून 7,100 पर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. योग्य जुना फोन एक्सचेंज केल्यास हा नवा कोरा एंट्री लेव्हल स्मार्टफोन फक्त 399 रुपयांमध्ये तुमचा होईल.
Tecno Spark 8C
या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क 8सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय सेन्सर मिळतो. फ्रंट पॅनलवर फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.
Tecno Spark 8C स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह UNISOC T606 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीनं यातील 3 जीबी रॅमसह 3 जीबी मेमरी फ्यूजन फीचर दिलं आहे. त्यामुळे गरज पडल्यास एकूण 6 जीबी रॅम वापरता येतो. सोबत असलेली 64 जीबी इंटरनल स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
ड्युअल सिम Tecno Spark 8C मध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. तसेच फिंगरप्रिंट सेन्सरच्या सुरक्षेसह फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आलं आहे. यातील IPX2 रेटिंग या फोनला पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचवते. तसेच पावर बॅकअपसाठी या टेक्नो मोबाईल 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी सिंगल चार्जमध्ये 89 दिवसांचा स्टँडबाय टाइम देईल, असा दावा कंपनीनं केला आहे.
हे देखील वाचा:
- ‘या’ शानदार Smartwatch वर गेम देखील खेळता येणार; किंमत 3 हजारांपेक्षा कमी
- घायाळ करणाऱ्या डिजाईनसह आला सर्वात पावरफुल Smartphone; इतकी आहे Oppo Find X5 आणि Oppo Find X5 Pro ची किंमत
- Sony च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह येणार Poco चा स्मार्टफोन; कमी किंमतीत पावरफुल प्रोसेसरची जोड