कोणताही गाजावाजा न करता किफायतशीर TECNO Spark 8P झाला लाँच
By सिद्धेश जाधव | Published: October 14, 2021 03:30 PM2021-10-14T15:30:59+5:302021-10-14T15:31:12+5:30
Budget Smartphone Tecno Spark 8P Launch: TECNO Spark 8P स्मार्टफोन 50MP camera, 4GB RAM आणि MediaTek Helio G70 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.
स्मार्टफोन निर्माता ब्रँड TECNO ने आज आंतरराष्ट्रीय बाजारात आपला एक नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने गुपचूप TECNO Spark 8P फोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 50MP camera, 4GB RAM आणि MediaTek Helio G70 चिपसेट असे स्पेक्स देण्यात आले आहेत. हा स्वस्त फोन लवकरच भारतासह इतर बाजारपेठांमध्ये पदार्पण करू शकतो.
TECNO Spark 8P चे स्पेसिफिकेशन्स
हा टेक्नो फोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनला मीडियाटेक के हीलियो जी70 चिपसेटची पॉवर मिळते. या डिवाइसयामध्ये अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच यात 4GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते.
TECNO Spark 8P मध्ये 4जी वोएलटीईसह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स मिळतात. तर सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. हा Turquoise Cyan, Iris Purple, Atlanta Blue आणि Cocoa Gold या रंगात विकत घेता येईल.
फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्स, आणि इतर दोन सेन्सर आहेत. या फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 8पी मध्ये 5,000एमएएचची बॅटरी 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. TECNO Spark 8P ची किंमत मात्र अजूनतरी समोर आली नाही.