Budeget phone: शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी भारतात येतोय स्वस्त Smartphone; बॅटरी बॅकअप असू शकतो मजबूत 

By सिद्धेश जाधव | Published: December 6, 2021 05:15 PM2021-12-06T17:15:01+5:302021-12-06T17:15:29+5:30

Budeget Phone Tecno Spark 8T: Tecno Spark 8T स्मार्टफोन लवकरच भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीनं सोशल मीडियावरून दिली आहे.

Tecno spark 8t india launch soon in low budget  | Budeget phone: शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी भारतात येतोय स्वस्त Smartphone; बॅटरी बॅकअप असू शकतो मजबूत 

Budeget phone: शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी भारतात येतोय स्वस्त Smartphone; बॅटरी बॅकअप असू शकतो मजबूत 

Next

Tecno कंपनी फक्त भारतात नाही तर जगभरात बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करण्यासाठी ओळखली जाते. किंमत जरी कमी असली तरी कंपनीचे फोन शाओमी-रियलमी सारख्या कंपन्यांना चांगली टक्कर देतात. आता लवकरच भारतात Tecno Spark 8T हा कंपनीचा स्मार्टफोन येणार आहे, अशी घोषणा कंपनीनं सोशल मीडियावरून केली आहे.  

टेक्नोनं ठराविक लाँच डेटचा उल्लेख मात्र पोस्टमध्ये केला नाही. परंतु टेक्नो स्पार्क 8टी स्मार्टफोन राउंडेड एज आणि बंपी कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल, हे मात्र पोस्टमधून समजलं आहे. कंपनीनं शेयर केलेल्या फोटोजनुसार, या फोनच्या उजवीकडे पॉवर बटन असेल, त्याचबरोबर वॉल्यूम बटन देखील देण्यात येईल.  

Tecno Spark 8T चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

मीडिया रिपोर्ट्स नुसार, Tecno Spark 8T स्मार्टफोन 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह बाजारात येईल. या फोनला MediaTek Helio G35 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात येईल. त्याचबरोबर 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देखील मिळू शकते, जी मायक्रोएसडी कार्डनं वाढवता देखील येईल. हा फोन Android 11 बेस्ड ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. स्पार्क सीरिजच्या इतर स्मार्टफोन प्रमाणे या बजेट स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी मिळू शकते. कंपनीनं फोनच्या किंमतीची माहिती दिली नाही, परंतु Tecno Spark 8T स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या आत सादर केला जाऊ शकतो.  

जुन्या Tecno Spark 8 चे स्पेसिफिकेशन्स    

टेक्नो स्पार्क 8 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन, 480nits ब्राईटनेस आणि 269ppi पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो.Tecno Spark 8 एक अँड्रॉइड गो स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉइड 11 गो व्हर्जनवर चालतो. ही गुगलची एक हलकी ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यामुळे या फोनमध्ये कमी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच हा टेक्नो स्मार्टफोन मीडियाटेकच्या हीलियो ए25 चिपसेटवर चालतो.     

या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 16MP चा मुख्य सेन्सर आणि एक क्यूवीजीए लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 8 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 8 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 65 दिवसांचा स्टँडबाय टाईम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.   

Web Title: Tecno spark 8t india launch soon in low budget 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.