सर्वांची बोलती बंद! Tecno Spark 9 भारतात लॉन्च, 11GB रॅम अन् किंमतही १० हजारापेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:46 PM2022-07-18T16:46:46+5:302022-07-18T16:47:55+5:30

Tecno Spark 9 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचा केवळ एकच व्हेरिअंट सध्या लॉन्च करण्यात आला आहे.

tecno spark 9 launched in india offers up to 11gb ram support price Specifications and Features | सर्वांची बोलती बंद! Tecno Spark 9 भारतात लॉन्च, 11GB रॅम अन् किंमतही १० हजारापेक्षा कमी

सर्वांची बोलती बंद! Tecno Spark 9 भारतात लॉन्च, 11GB रॅम अन् किंमतही १० हजारापेक्षा कमी

googlenewsNext

नवी दिल्ली-

Tecno Spark 9 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचा केवळ एकच व्हेरिअंट सध्या लॉन्च करण्यात आला आहे. यात तब्बल 11GB रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे. 

Tecno Spark 9 Price 
Tecno Spark 9 फोन सिंगल व्हेरिअंट ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची किंमत ९,४९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनचा सेल येत्या २३ जुलैपासून सुरू होत आहे. Amazon या ई-कॉमर्स वेबसाइटवरुन हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. 

कंपनीनं फोन Infinity Black आणि Sky Mirror रंगाच्या पर्यायत उपलब्ध करुन दिला आहे. या फोनची विक्री येत्या अॅमेझॉन प्राइम डे सेलच्या माध्यमातून केली जाणार आहे. 

Tecno Spark 9 Specifications and Features
Tecno Spark 9 फोनमध्ये 6.6 इंचाची LCD HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन वॉटरड्रॉप नॉचसह येतो. याशिवाय डिस्प्ले 90Hz अंतर्गत रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं MediaTek Helio G37 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. 

फोनमध्ये 6GB रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये रॅम एक्सपान्शन फीचर देखील दिलं आहे. याच्या सहाय्यानं युझरला व्हर्च्युअली 11GB पर्यंत रॅम वाढवता येणार आहे. फोटोग्राफीबाबत बोलायचं झालं तर रिअरमध्ये ड्युअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

प्रायमरी कॅमेरा 13MP आहे. यासोबत LED प्लॅशलाइट देखील आहे. स्मार्टफोन Android 12 बेस्ड HiOS UI ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि रिअरमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या किमतीत Tecno Spark 9 ची स्पर्धा Redmi 10A, Realme C31, Poco C31 आणि इतर स्मार्टफोनशी आहे. 

नुकतंच Tecno Camon 19 सीरिज भारतात लॉन्च करण्यात आली होती. या सीरिजमध्ये 64MP रिअर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा सेटअप देण्यात आला होता.

Web Title: tecno spark 9 launched in india offers up to 11gb ram support price Specifications and Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.