1 जुलैला लाँच होणार स्वस्त टेक्नो स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि 13एमपी कॅमेऱ्यासह येणार Spark Go 2021
By सिद्धेश जाधव | Published: June 28, 2021 05:13 PM2021-06-28T17:13:18+5:302021-06-28T17:16:19+5:30
Tecno Spark Go 2021: Tecno ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून ही माहिती दिली कि, टेक्नो स्पार्क गो 2021 स्मार्टफोन येत्या 1 जुलैला दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल.
Tecno नेहमीच स्वस्त स्मार्टफोन्स घेऊन येते. या स्मार्टफोन्समध्ये मिळणारे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स मोठमोठ्या कंपन्यांना देखील लो बजेट सेगमेंटमध्ये टक्कर देतात. आता कंपनीने लो बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. 1 जुलैला भारतात कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Tecno Spark Go 2021 लाँच करणार आहे.
कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून ही माहिती दिली. टेक्नो स्पार्क गो 2021 स्मार्टफोन येत्या 1 जुलैला दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. या फोनचे प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट अमेझॉन इंडियावर लाईव करण्यात आले आहे. याचा अर्थ असा कि, Tecno Spark Go 2021 अमेझॉनवरून विकत घेता येईल.
Tecno Spark Go 2021 चे स्पेसिफिकेशन्स
अमेझॉन इंडियावरील प्रोडक्ट पेजवरून टेक्नो स्पार्क गो 2021 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. Tecno Spark Go 2021 मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल, यासोबत कंपनीने फ्रंट फ्लॅश देखील दिला आहे.
Tecno Spark Go 2021 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी एआय सेन्सर मिळेल. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. Tecno Spark Go 2021 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 1 जुलैलाच समोर येईल.