एकच नंबर! 8000 पेक्षा किंमतीत येतोय 6GB RAM असलेला स्मार्टफोन; शाओमी-रियलमी नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल 

By सिद्धेश जाधव | Published: February 12, 2022 12:46 PM2022-02-12T12:46:08+5:302022-02-12T12:46:29+5:30

Affordable Smartphone: Tecno लवकरच भारतात 8000 रुपयांच्या आत 6GB रॅम असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे.

Tecno To Launch Affordable Smartphone With 6GB RAM Price Under Rs 8000 Check Details  | एकच नंबर! 8000 पेक्षा किंमतीत येतोय 6GB RAM असलेला स्मार्टफोन; शाओमी-रियलमी नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल 

एकच नंबर! 8000 पेक्षा किंमतीत येतोय 6GB RAM असलेला स्मार्टफोन; शाओमी-रियलमी नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल 

googlenewsNext

Tecno नं यावर्षी आपले तीन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. यात Tecno Pop 5 LTE, Tecno Pop 5 Pro आणि Tecno Pova Neo चा समावेश आहे. हे तिन्ही फोन कमी किंमतीत चांगल्या फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. परंतु या महिन्याच्या अखेरपर्यंत कंपनी आपल्या स्पार्क लाईनअपमध्ये 6GB रॅमसह एक नवीन किफायतशीर स्मार्टफोन लाँच करणार आहे.  

कंपनीनं शुक्रवारी आपल्या नव्या स्मार्टफोनची माहिती दली आहे. हा आगामी स्मार्टफोन “फ्लॅगशिप-ग्रेड” स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल आणि याची किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी असेल, असं कंपनीनं सांगितलं आहे. हा फोन अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. गॅजेट्स 360 नुसार यात 6GB रॅम देण्यात येईल. अन्य स्पेक्स मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. अलीकडेच कंपनीनं Tecno Spark 8C ची देखील घोषणा केली आहे.  

काही दिवसांपूर्वी आलेल्या Tecno POP 5S के स्पेसिफिकेशन्स  

Tecno POP 5S स्मार्टफोनमध्ये 5.7-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HD+ 720 x 1520 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी नॉच देण्यात आली आहे. ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18:9 आणि स्क्रीन टू बॉडी रेशियो 84 टक्के आहे.  

हा स्मार्टफोन 1.4GHz क्वॉड-कोर Unisoc SC98632E प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. सोबत 3GB RAM आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या हलक्या-फुलक्या गो एडिशनसह बाजारात आला आहे, यात Android 10 Go Edition आहे. यात गुगल अ‍ॅप्सचे लाईट व्हर्जन मिळतात,  अन्य अ‍ॅप्स देखील कमी रॅमवर स्मूद चालतात. कनेक्टिव्हिटीसाठी या ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, GPS, Bluetooth v4.2, 3.5mm ऑडियो जॅक, FM Radio, आणि microUSB पोर्ट मिळतो.  

फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात LED सह 5MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक AI लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी 2MP कॅमेरा LED फ्लॅशसह मिळतो. या टेक्नो स्मार्टफोनमध्ये 3,020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा:

Web Title: Tecno To Launch Affordable Smartphone With 6GB RAM Price Under Rs 8000 Check Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.