फोनवर बोलताना एका झटक्यात तरुणीचा मृत्यू; तुम्हीही करत नाही ना, ‘असा’ जीवघेणा प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 04:23 PM2021-09-01T16:23:21+5:302021-09-01T16:25:22+5:30
मोबाईलशी संबंधित अशीच एक ह्दयद्रावक घटना ब्राझीलहून समोर आली आहे. याठिकाणी एका मुलीचा मृत्यू चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलताना झाला आहे.
अनेकदा आपण ऐकलं असेल मोबाईल चार्जिंग करताना बोलत असाल तर त्याचा स्फोट होण्याची भीती असते. मोबाईल चार्जिंग करताना फोनवर बोलू नका असा सल्ला तज्ज्ञ देत असतात. त्यानंतरही अनेकजण मोबाईल चार्जिंग करताना फोनचा वापर करत असतात. त्यामुळे दुर्दैवी घटनाही घडतात. मोबाईलशी संबंधित अशीच एक ह्दयद्रावक घटना ब्राझीलहून समोर आली आहे. याठिकाणी एका मुलीचा मृत्यू चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलताना झाला आहे.
ब्राझीलच्या संतोरम इथं राहणाऱ्या राजदा फ्रेइरा डी ओलिवेरिया(Radja Ferreira De Oliveria) चा मृत्यू घरी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजदा तिच्या घरात फोनवर चार्जिग लावून बोलत होती. तेव्हा तिला अचानक जोराचा झटका लागला. याआधी तिला काय झाले हे कळेल तोपर्यंत राजदा मृत्यू झाला होता. तिला हॉस्पिटला उपचारासाठी नेले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. राजदानं जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावली होती तेव्हा बाहेर पाऊस पडत होता आणि अचानक वीज कोसळल्यानं चार्जिंग पॉईंटमध्ये जास्तीचा करंट आला होता.
प्राथमिक उपचारानंतरही जीव वाचला नाही
राजदा फोनवर बोलता बोलता अचानक खाली कोसळली. घरच्यांनी तिला उठवून प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या शरीरात काहीच हालचाल झाली नाही. त्यानंतर तातडीने राजदाला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासलं असता तिचा आधीच मृत्यू झाल्याचं कळालं. डॉक्टरांनी राजदा मृत घोषित केले. मागील काही आठवड्यापासून वीजेच्या झटक्यानं अनेक मृत्यू झालेत. यापूर्वी ब्राझीलमधील एक व्यक्ती ज्याचं नाव सेमीओ टावर्स असं होतं त्याचादेखील फोनवर बोलताना मृत्यू झाला होता.
प्रशासनाकडून लोकांना आवाहन
एका आठवड्यात मोबाईलहून करंट लागल्यानंतर मृत्यू झालेली ही तिसरी घटना आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकांना आवाहन करत म्हटलंय की, जर पाऊस होत असेल तर मोबाईल चार्जिंगला लाऊन युजर्सने त्याचा वापर करू नये. आधी मोबाईल चार्जिंग होऊ द्या त्यानंतरच त्याचा वापर करा. पावसाच्या काळात अनेकदा वीज कोसळण्याच्या घटना घडतात. विद्युत खांबावर वीज कोसळल्यानं त्याचा अतिरिक्त ताण लाईनवर पडतो. त्यावेळी कानाजवळ हातात मोबाईल ठेऊन चार्जिंगला फोन ठेवणं हे जीवघेणं ठरू शकतं. स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर अशा गोष्टी लोकांनी टाळल्या पाहिजेत असं सरकारनं सांगितले आहे.