नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढविणार; मोबाईलवर बोलणे महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 06:24 PM2021-12-31T18:24:57+5:302021-12-31T18:25:57+5:30
या महिन्याच्या सुरुवातीलाच जियो, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियानं टॅरिफमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ केली आहे. पुढील वर्षी देखील या किंमती अजून वाढणार आहेत.
नवीन वर्षात तुमचा प्री पेड रिचार्ज आणि पोस्टपेड बिल वाढू शकतं. टेलीकॉम कंपन्या पुन्हा एकदा टॅरिफ बढ़ा वाढवू शकतात. टेलिकॉम इंडस्ट्रीमधील तिन्ही बड्या कंपन्यांनी 1 डिसेंबर 2021 पासून आपल्या प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली होती. यावर्षी 20-25 टक्के वाढ करूनही पुढील वर्षी मोबाईलवर बोलणे महागणार आहे. यामागे भारतात येणारं 5G नेटवर्क कारण असू शकतं.
2022 मध्ये देशात 5G नेटवर्क सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला काही मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल. विशेष म्हणजे ट्रायल बेसिसच्या ऐवजी ही सेवा थेट ग्राहकांना उपलब्ध होईल. 5जी मुळे टेलीकॉम कंपन्यांच्या उत्पनात वाढ होईल. परंतु त्यासाठी कंपन्यांना तेवढाच खर्च देखील करावा लागेल.
आधीच कर्जात असलेल्या टेलिकॉम कंपन्यांना 2022 मध्ये 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभाग घ्यावा लागेल. यावर मोठी रक्कम खर्च होणे अपेक्षित आहे. हा पैसे कंपन्या टॅरिफ वाढवून परत मिळवू शकतात. सध्या भारत जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा प्लॅन असलेल्या देशांपैकी एक देश आहे. परंतु पुढील वर्ष हे चित्र बदलू शकतं.
यावर्षी केलेल्या भाववाढीमुळे एयरटेल आणि जियोकडे पैसे आले आहेत, परंतु वोडाफोन-आयडिया मात्र अजूनही सावरलेली नाही, अशी माहिती फिच रेटिंग्सचे सीनियर डायरेक्टर नितिन सोनी यांनी दिली आहे. त्यांनी पुढील 12 महिन्यात टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा दरवाढ करतील, असा अंदाज वर्तवला आहे.
हे देखील वाचा:
WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर
OnePlus फॅन्ससाठी बॅड न्यूज! भारतातील 3 मॉडेल्स होणार बंद, यावर्षी लाँच झालेल्या वनप्लसचाही समावेश