WhatsApp, Facebook ढेपाळलं, 'टेलिग्राम'चं भाग्यच फळफळलं; 'त्या' ७ तासांत मिळाले ७ कोटी नवे युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 11:42 AM2021-10-06T11:42:16+5:302021-10-06T11:42:46+5:30

Facebook outage : सोमवारी रात्री व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर या सेवा तब्बल सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी झाल्या होत्या बंद.

Telegram founder says over 70 million new users joined during Facebook outage | WhatsApp, Facebook ढेपाळलं, 'टेलिग्राम'चं भाग्यच फळफळलं; 'त्या' ७ तासांत मिळाले ७ कोटी नवे युजर्स

WhatsApp, Facebook ढेपाळलं, 'टेलिग्राम'चं भाग्यच फळफळलं; 'त्या' ७ तासांत मिळाले ७ कोटी नवे युजर्स

Next
ठळक मुद्देसोमवारी रात्री व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर या सेवा तब्बल सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी झाल्या होत्या बंद.

सोमवारी रात्री व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर (Whatsapp, Instagram, Facebook and facebook messenger) या सेवा तब्बल सहा तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडणींमुळे या तिन्ही सेवा बंद पडल्या होत्या. याचा युझर्ससह फेसबुकलाही मोठा फटका बसला. परंतु टेलिग्रामला (Telegram) मात्र याचा फायदा झाला. यादरम्यान टेलिग्रामला तब्बल ७ कोटी नवे युझर्स मिळाले. 

व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुकची बंद झालेल्या सेवेचा फायदा सोमवारी टेलिग्रामला मिळाला. या दरम्यान टेलिग्रामला तब्बल ७ कोटी नवे ग्राहक मिळाल्याची माहिती टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव (founder of telegram Pavel Durov) यांनी दिली. टेलिग्रामवर दररोज येणाऱ्या युझर्सची संख्या वाढली आणि आम्ही तब्ब्ल ७ कोटी नव्या युझर्सचं स्वागत केलं, अशी प्रतिक्रिया यानंतर दुरोव यांनी दिली. 

"अनेक युझर्स एकाच वेळी मोठ्या प्रमाणात साईन अप करण्यासाठी आले होते, त्यामुळे अमेरिकेत काही लोकांना कमी स्पीडचा अनुभव आला असेल. परंतु बहुसंख्य युझर्सना नेहमीप्रमाणेच याचा अनुभव मिळत होता," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

फेसबुकच्या सर्व सेवा बंद
फेसबुक आणि इन्स्टाग्राम सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद राहिल्यानंतर भारतीय वेळेनुसार ते ३ वाजून २४ मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आलं. तर दुसरीकडे Whatsapp तब्बल ७ तासांनंतर म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी ४ वाजून १९ मिनिटांनी सुरू झालं. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या तिन्हीवर फेसबुकचं स्वामित्व आहे. यामुळे या तिन्हीचे सर्व्हर एकमेकांशी जोडलेले आहे. 

या तिन्ही सेवा बंद होण्यामागचं कारण Facebook चं DNS म्हणजेच Domain Name System फेल होणं होतं. DNS फेल झाल्यामुळे फेसबुकपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या युझर्सचा इंटरनेट रूट बाधित झाला. DNS कोणत्याही वेबसाईटला आयपी ॲड्रेसमध्ये ट्रान्सलेट करुन युझरला त्या पेजपर्यंत पोहोचवतो, जे पेज त्या युझरला उघडायचं आहे.

कर्मचाऱ्यांनाही समस्या
या तिन्ही सेवा ज्यावेळी बंद झाल्या त्यावेली फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागला. त्यांच्या कार्यालयाची मेल सिस्टम आणि कर्मचाऱ्यांच्या ॲक्सेस कार्डनंही काम करणं बंद केलं होतं.  यानंतर फेसबुकचे मुख्यं तंत्रज्ञान अधिकारी माईक स्करोपफेरनं लोकांची माफीही मागितली.

Web Title: Telegram founder says over 70 million new users joined during Facebook outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.