Telegram मध्ये मोठा अपडेट! नवीन इमोजी आणि चॅट थीममुळे चॅटिंगची रंगत वाढणार
By सिद्धेश जाधव | Published: September 22, 2021 01:11 PM2021-09-22T13:11:30+5:302021-09-22T13:11:39+5:30
Telegram new feature update: Telegram ने आपल्या नव्या अपडेटच्या माध्यमातून नवीन फीचर सादर केले आहेत. यात नवीन इमोजी आणि चॅट थीमचा समावेश आहे.
Telegram ने आपली नव्या अपडेटच्या माध्यमातून नवीन अॅपमध्ये जोडले आहेत. नवीन अपडेटमध्ये इंटरॅक्टिव्ह इमोजी आणि नवीन चॅट थीमचे फिचर देण्यात आले आहे. या नवीन फीचर्समुळे टेलिग्राम वापरणाऱ्या युजर्सना चांगला अनुभव मिळेल. चला जाणून घेऊया या नवीन फीचर्सची माहिती.
टेलिग्राम चॅट थीम फिचर
Telegram वर चॅट कस्टमाइज आणि ऑर्गेनाइज करण्यासाठी चॅट फोल्डर आणि अॅनिमेटेड बॅकग्राउंड सारखे अनेक शानदार मिळतात. आता यात नवीन चॅट थीमचा देखील समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे युजर्स पर्सनल चॅटसाठी नवीन थीम सेट करू शकतात. अॅपमध्ये नवीन 8 थीमचा समावेश केला आहे, ज्या युजर्स स्पेसिफिक खाजगी चॅटवर वापरू शकतात. या नवीन थीम कलरफुल ग्रेडियंट मेसेज बबल, आकर्षक अॅनिमेटेड बॅकग्राउंड आणि इतर वेगवेगळे बॅकग्राउंड ऑफर करतात.
टेलिग्राम इंटरॅक्टिव्ह इमोजी फिचर
या फिचरचा वापर करून युजर सहज एखादी इमोजी प्रायव्हेट चॅटमध्ये पाठवू शकतात. यात फुल स्क्रीन इफेक्टचा वापर करण्यासाठी अॅनिमेटेड इमोजीवर क्लिक करावे लागेल. जर रिसिव्हर आणि सेंडर दोन्हीच्या चॅट विंडो ओपन असतील तर एक स्पेशल अॅनिमेशन दिसेल.
नवीन टेलिग्राम फिचर
नव्या अपडेटमध्ये छोट्या ग्रुपसाठी रीड रिसिप्ट (Read Receipts) फीचरचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता युजर लाईव्ह स्ट्रीम व्हिडीओ रेकॉर्ड देखील करू शकतात. Telegram वर व्यूवर्ससाठी होणारे लाईव्ह इव्हेंट, लाईव्ह स्ट्रीम आणि व्हिडीओ चॅट अॅडमिन रेकॉर्ड करू शकतील.