टेलिग्राम मॅसेंजरचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल

By शेखर पाटील | Published: October 23, 2017 10:28 AM2017-10-23T10:28:35+5:302017-10-23T10:29:42+5:30

टेलिग्राम या मॅसेंजरने आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट सादर केले असून यात लाईव्ह लोकेशन शेअरिंगसह नवीन मीडिया प्लेअर आणि अतिरिक्त भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

telegram messenger update: know all features | टेलिग्राम मॅसेंजरचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल

टेलिग्राम मॅसेंजरचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल

Next

टेलिग्राम मॅसेंजरची ४.४ ही नवीन आवृत्ती जगभरातील युजर्सला सादर करण्यात आली आहे. यातील सर्व बदलांबाबत एका ब्लॉग पोस्टद्वारे माहिती देण्यात आली आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे लाईव्ह लोकेशन शेअरिंग होय. व्हाटसअ‍ॅपनेही अलीकडे हे फिचर सादर केले आहे. याचसोबत आता टेलिग्राम मॅसेंजरच्या युजर्सलाही वैयक्तीक चॅटींग अथवा कोणत्याही ग्रुपमध्ये आपले लाईव्ह लोकेशन टाकता येणार आहे. यासाठी अटॅचमेंट मेन्यूमध्ये जाऊन ‘शेअर माय लोकेशन फॉर...’ हा पर्याय निवडावा लागेल. याशिवाय टेलिग्राम मॅसेंजरमध्ये आता नवीन ऑडिओ प्लेअर देण्यात आला आहे. परिणामी कुणीही एमपीथ्री फाईलच्या माध्यमातून संगीत ऐकतांना आता नवीन प्लेअर दिसू लागला आहे. याचा लूक अतिशय आकर्षक असाच आहे. याशिवाय यात प्ले-लिस्ट दिसण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. 

याशिवाय टेलिग्राम मॅसेंजरमध्ये आता फ्रेंच, इंडोनेशियन, मलाय, रशियन आणि युक्रेनियन या भाषांचा सपोर्ट देण्यात आला असून यात लवकरच पर्शियनचा समावेश होणार आहे. परिणामी टेलिग्राम मॅसेंजर आता जगातील १३ भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. अर्थात सेटींगसह अन्य मेन्यू आता या भाषांमध्ये वापरता येतील. याशिवाय ताज्या अपडेटमध्ये ग्रुप चॅट अधिक सुलभ आणि आकर्षक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात सुपरग्रुपमधील अ‍ॅडमीनने त्या ग्रुपमध्ये पोस्ट केल्यास तो अ‍ॅडमीन असल्याचा ‘बॅज’ दर्शविण्यात येणार आहे. हे अपडेट अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी युजर्सला क्रमाक्रमाने प्रदान करण्यात येत आहेत.

( छायाचित्र सौजन्य: टेलिग्राम ब्लॉग )

Web Title: telegram messenger update: know all features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.