Telegram वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे? मोफत सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय  

By सिद्धेश जाधव | Published: May 30, 2022 09:27 AM2022-05-30T09:27:48+5:302022-05-30T09:27:58+5:30

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप Telegram आता आपल्या काही फीचर्ससाठी युजर्सकडून शुल्क आकारू शकतं.  

Telegram Will Start Premium Service Very Soon  | Telegram वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे? मोफत सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय  

Telegram वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे? मोफत सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय  

googlenewsNext

WhatsApp नंतर Telegram हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप जास्त लोकप्रिय आहे. या अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स मोफत दिले जातात म्हणून युजर्स याला पसंती देतात. परंतु आता हीच खासियत बंद होणार असल्याची बातमी आली आहे. रिपोर्टनुसार, लवकरच टेलीग्राम आपली प्रीमियम सर्विस लाँच करू शकतं, ज्यासाठी शुल्क आकारलं जाईल. म्हणजे इतकी वर्ष मोफत असलेलं अ‍ॅप युजर्सना आता पैसे देऊन वापरावं लागू शकतं.  

कंपनीचा दावा खोटा ठरणार  

याआधी टेलिग्राम आपण No Ads, No Subscription Fees या तत्वावर काम करणार असल्याचा दावा करत होतं. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच टेलिग्रामची प्रीमियम सर्विस येऊ शकते. यासाठी किती पैसे मोजावा लागतील, याची माहिती मात्र मिळाली नाही. सध्या मिळलेल्या माहितीनुसार, लवकरच कंपनी 'Premium-Exclusive' फीचर लाँच करू शकते. App च्या बेटा व्हर्जनमधून याचे संकेत दिसत आहे. नवीन व्हर्जन कधी लाँच होईल याची अधिकृत माहिती देखील मिळाली नाही.  

नवीन फीचर येणार  

टेलीग्रामच्या बीटा व्हर्जनमध्ये अनेक फीचर्स देखील दिसले आहेत. जे आगामी अपडेटमध्ये युजर्सच्या भेटीला येतील. यावेळी कंपनी आपल्या अ‍ॅपची डिजाईन देखील बदलू शकतो. नवीन व्हर्जनमध्ये रिअ‍ॅक्शन फीचर देखील मिळू शकतं. कंपनी ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या मार्गावर जात आहे. यांनी देखील अ‍ॅपचं प्रीमियम व्हर्जन सादर केलं आहे आणि काही खास फीचर्ससाठी यूजर्सना पैसे मोजावे लागतात आणि आता टेलिग्राम देखील हा मार्ग अवलंबू शकतं.  

Web Title: Telegram Will Start Premium Service Very Soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.