सात तास चाला, रोज कमवा २८ हजार रुपये! टेस्लाची रोबोला शिकवण्यासाठी ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 06:48 AM2024-08-21T06:48:03+5:302024-08-21T06:49:51+5:30

'मौरान कॅप्चर' सूट आणि व्हच्र्युअल रिअॅलिटी हेडसेट घालून चाचणी मार्गावर सात तास चालणे हे त्याच्या कामाचे स्वरूप आहे.

Tesla is hiring workers for $48 an hour to wear motion-capture suits to train its humanoid robots | सात तास चाला, रोज कमवा २८ हजार रुपये! टेस्लाची रोबोला शिकवण्यासाठी ऑफर 

सात तास चाला, रोज कमवा २८ हजार रुपये! टेस्लाची रोबोला शिकवण्यासाठी ऑफर 

टेक्सास (अमेरिका) : जगातील सर्वांत मोठी इलेक्ट्रॉनिक वाहन कंपनी टेस्लाने 'सात तास चाला आणि २८ हजार रुपये कमवा' अशी एक अद्भुत ऑफर जाहीर केली. टेस्ला 'ऑप्टिमस' नावाचा मानवी रूपातील (हामनीईड) रोबोट विकसित करीत आहे. त्याला 'मोशन-कॅप्बर' तंत्रज्ञानाचा वापर करून माणसासारखे चालणे शिकवण्यात येत आहे. हालचाली टिपून त्याची नक्कल करणे असे हे तंत्रज्ञान आहे. 

त्याअंतर्गत कंपनी लोकांना केवळ चालण्यासाठी कामावर ठेवत आहे. एक तास चालल्यास चार हजार रुपये मिळतात. एका दिवसात सात तास चालून व्यक्ती २८ हजार रुपये कमावू शकतो 'ऑप्टिमस' रोबोटला प्रशिक्षित करण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास 'डाटा कलेक्शन ऑपरेटर' असे पदनाम देण्यात आले आहे. 'मौरान कॅप्चर' सूट आणि व्हच्र्युअल रिअॅलिटी हेडसेट घालून चाचणी मार्गावर सात तास चालणे हे त्याच्या कामाचे स्वरूप आहे.

रोबो 'ऑष्टिमस'च्या प्रशिक्षणाचा अट्टाहास 
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी 3 २०२२ मध्ये पहिल्यांदा 'ऑष्टिमस ची संकल्पना मांडली होती. कारखान्यात काम करण्यापासून वैयक्तिक काळजी घेण्याची सेवा देण्यापर्यंत विविध कामे ऑप्टिमस ने करावी, अशी संकल्पना आहे. त्यानुसार 'ऑडिमस' चा विकास जात आहे. 'मोशन कैप्टर तंत्रज्ञानाद्वारे 'ऑष्टिमस'ला प्रशिक्षित करण्यासाठी कंपनी मागच्या वर्षीपासून प्रवाल करीत आहे.

Web Title: Tesla is hiring workers for $48 an hour to wear motion-capture suits to train its humanoid robots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.