ते हिमनगाचे टोक! सॅमसंग जगभरात ३० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार; भारतातही नोकऱ्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 07:38 PM2024-09-11T19:38:22+5:302024-09-11T19:38:36+5:30

Samsung Job Cuts News: जगभरात सॅमसंगचे 267800 कर्मचारी आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी हे दक्षिण कोरियाच्या बाहेर काम करतात.

That's the tip of the iceberg! Samsung layoffs 30 percent of employees worldwide; Jobs cuts will also in India | ते हिमनगाचे टोक! सॅमसंग जगभरात ३० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार; भारतातही नोकऱ्या जाणार

ते हिमनगाचे टोक! सॅमसंग जगभरात ३० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार; भारतातही नोकऱ्या जाणार

आज सॅमसंगने भारतातील २०० कर्मचाऱ्यांना कमी केल्याची बातमी आली होती. हा आकडा कमी असल्याने महत्वाचा वाटत नसला तरी ते फक्त हिमनगाचे टोक होते. अमेरिकेसह अनेक देशांत मंदीचे वारे सुरु झाले आहेत. अनेक बड्या कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करत आहेत. असे असताना जगातील आणखी एक मोठी कंपनी सॅमसंगने एकूण कर्मचाऱ्यांच्या ३० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे. 

सॅमसंगच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. अमेरिकेत २०१० नंतरची दुसरी मोठी मंदीची लाट दरवाजा ठोठावत आहे. साडेचारशेहून अधिक कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. असे असताना दक्षिण कोरियाची टीव्ही, फ्रिज, मोबाईल आदी अनेक उत्पादने घेणारी सॅमसंगही मेटाकुटीला आली आहे. सॅमसंगही जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बनविणारी कंपनी आहे. 

कामावरून कमी केले जाणारे हे कर्मचारी प्रामुख्याने अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिका या क्षेत्रातील आहेत. प्रशासकीय, सेल्स, मार्केटिंग स्टाफवर याचा परिणाम होणार आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत कर्मचारी कपात केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

जगभरात सॅमसंगचे 267800 कर्मचारी आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी हे दक्षिण कोरियाच्या बाहेर काम करतात. सेल्स आणि मार्केटिंगमध्ये 25100 कर्मचारी आहेत. गेल्या १५ वर्षांत कंपनीने सर्वात कमी महसूल मिळविला आहे. कंपनीचा चिप बनविण्याचा व्यवसायही घसरणीला लागला आहे. एकीकडे कंपनीने भारतात मध्यम पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगले पॅकेज देण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भारतातील १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी केली जात आहे, असेही रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. 
 

Web Title: That's the tip of the iceberg! Samsung layoffs 30 percent of employees worldwide; Jobs cuts will also in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग