सावधान! 'हे' 23 ऍप्स फेसबुकपर्यंत पोहोचवतात तुमची खासगी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:51 PM2019-01-04T12:51:52+5:302019-01-04T12:56:44+5:30

फेसबुक युजर्सची खासगी माहिती चोरी करत असल्याचा अनेकदा आरोप झाला.

These 23 apps reach Facebook, get your personal information, complete list | सावधान! 'हे' 23 ऍप्स फेसबुकपर्यंत पोहोचवतात तुमची खासगी माहिती

सावधान! 'हे' 23 ऍप्स फेसबुकपर्यंत पोहोचवतात तुमची खासगी माहिती

Next

नवी दिल्ली- फेसबुक युजर्सची खासगी माहिती चोरी करत असल्याचा अनेकदा आरोप झाला. त्यासंदर्भात ब्रिटनची संस्था असलेल्या चॅरिटी प्रायव्हसी इंटरनॅशनलनं जर्मनीच्या काओस कॉम्प्युटर काँग्रेसमध्ये एक अहवालही सादर केला होता. ज्यात फेसबुक युजर्सचा डेटा चोरत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अहवालानुसार फेसबुक अशा मोबाइल युजर्सचा डेटा चोरतो, जे युजर्स मोबाइलमध्ये ऍप्लिकेशन असूनही त्याचा वापर करत नाहीत.

चॅरिटी प्रायव्हसी इंटरनॅशनल संस्थेनं आतापर्यंत 34 ऍप्सची सखोल तपासणी केली आहे. त्यामध्ये 23 ऍप्स हे युजर्सचा डेटा चोरत असल्याचं समोर आलं आहे. जास्त करून ऍप बनवणाऱ्या कंपन्या या फेसबुक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट(एसडीके)चा प्रयोग करतात. एसडीकेच्या माध्यमातून डेव्हलप झालेली ऍप्स फेसबुकशी आपसुकच जोडली जातात. त्यामुळे युजर्स जेवढ्या वेळा या ऍप्सचा वापर करेल, तेव्हा तेव्हा त्याचा खासगी डेटा थेट फेसबुकपर्यंत पोहोचेल. आपल्या मोबाइलमधील सेव्ह असलेले नंबर, फोटो-व्हिडीओ, इमेल्स आणि ज्या ज्या वेबसाइटला भेट देतो आणि किती वेळा भेट देतो, त्याचीही माहिती फेसबुकपर्यंत आपोआप पोहोचते. यातून फेसबुकला खूप मोठा फायदा मिळतो. 

भाषा शिकवणारे ऍप डुओलिंगो, ट्रॅव्हल अँड रेस्टॉरंट ऍप, ट्रिप ऍडवायझर, जॉब डेटाबेस इनडिड आणि फ्लाइट सर्च इंजिन स्काय स्कॅनर, प्रेग्नंसी प्लस, मायग्रेन बडी, बायबल प्लस आणि मुस्लिम प्रो उन अशा प्रकारच्या 23 ऍप्सच्या माध्यमातून डेटा चोरीला जात असल्याचं समोर आलं आहे. या संस्थेनं इतर ऍप्सच्या नावांचं खुलासा केलेला नाही. या ऍप्सच्या माध्यमातून फेसबुकला युजर्सच्या व्यवहाराची माहिती मिळते. तसेच युजर्सनं ऍड पर्सनलायझेशन डिसेबल केल्यास युजर्सची माहिती गुप्तच राहते. 

Web Title: These 23 apps reach Facebook, get your personal information, complete list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.