'या' अॅप्सच्या माध्यमातून केली जात आहे पार्टनर्सची हेरगिरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 01:29 PM2018-07-26T13:29:01+5:302018-07-26T13:29:09+5:30

संशोधकांनी ही माहिती मिळवली की, या अॅप्समध्ये केवळ ट्रेडिशनल स्पायवेअरच नाही तर याचा सॉफ्टवेअरसारखा वापर केला जात आहे. त्यामुळे सध्याच्या अॅंटी-स्पायवेअरना या अॅप्सच्या वापरापासून सुरक्षा मिळवणे जवळपास अशक्य आहे. 

These apps being used to spy on partners | 'या' अॅप्सच्या माध्यमातून केली जात आहे पार्टनर्सची हेरगिरी!

'या' अॅप्सच्या माध्यमातून केली जात आहे पार्टनर्सची हेरगिरी!

googlenewsNext

नवी दिल्ली : मार्केटमध्ये असे हजारो अॅप्स उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून घरगुती हिंसाचाराचे शिकार झालेले लोक छुप्या पद्धतीने आपल्या पार्टनर्सची हेरगिरी करतात. हे अॅप्स इन्स्टॉल करणं सोपं असून अशा अॅप्सचं मार्केटिंग ऑनलाईन जाहिराती, ब्लॉग्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून केली जात आहे. याचा खुलासा एका रिसर्चमधून झालाय. 

काही असेही अॅप्स आहेत, जे पीडितांसाठीच होते. त्यांना टारगेट केलं गेलं होतं. असंच एक अॅप आहे ज्यात 'Mobile Spy App for Personal Catch Cheating Spouses'  नावाचं वेबपेज आहे. पण काही असेही अॅप्स होते ज्यांची ऑफिशिअल वेबसाईट केवळ एम्प्लॉई आणि चाइल्ड ट्रॅफिकींगवर केंद्रीत होत्या. पण त्यातही काही सर्च टर्मचा खुबीने केलेला वापर बघायला मिळाला. ज्यात 'track my girlfriend' किंवा 'how to catch a cheating spouse with his cell phone' यांचा समावेश आहे. 

यूएसच्या कॉर्नल यूनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी राहुल चॅटर्जीनुसार, याप्रकारचे हजारो अॅप्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही ते सहज शोधू शकता आणि जे सध्याचे अॅटी-स्पायवेअऱ अॅप्स आहे ते यांना डिटेक्टही करू शकत नाही. त्यामुळे हिंसेने पीडित लोकांना याचा अंदाजही येत नाही की, त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे. 

संशोधकांनी आपला रिपोर्ट गुगलकडे सोपवला, ज्यानंतर गुगलने आपल्या प्ले स्टोरच्या पॉलिसीमध्ये बदल केला आणि नियम कठोर केलेत. जेणेकरून असे अॅप्स डाऊनलोड केले जाऊ नये. घरगुती हिंसाचाराचे शिकार झालेल्या अनेक लोकांनी ऑनलाईन गुप्तहेरी केली जात असल्याची प्रकरणे सांगितली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हेरगिरी केली जात असलेल्या व्यक्तीला तोपर्यंत हे कळत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवणारा त्यांचा पार्टनर त्यांच्यासमोर येत नाही.

गुगल आणि अॅपल दोन्ही कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरून असा अॅप्सच्या विक्रीला परवानगी दिली नाहीये. पण तरीही काही असे अॅप्स बिनधास्त वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून विकले जात आहेत. संशोधकांनुसार ही गंभीर बाब असून याच्याशी दोन हात करणे सोपं नसेल. 
 

Web Title: These apps being used to spy on partners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.