तुम्हीही 'हे' पासवर्ड ठेवत असाल तर व्हा सावध, २०१८ मध्ये हॅक झालेल्या पासवर्डची यादी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:07 PM2018-12-15T16:07:59+5:302018-12-15T16:10:36+5:30

२०१८ मध्ये सर्वात जास्त हॅक झालेल्या पासवर्डचा खुलासा झाला आहे. हा खुलासा सायबर सिक्युरिटी संस्था स्प्लॅशडेटाने केला आहे.

These are 25 worst password worldwide | तुम्हीही 'हे' पासवर्ड ठेवत असाल तर व्हा सावध, २०१८ मध्ये हॅक झालेल्या पासवर्डची यादी!

तुम्हीही 'हे' पासवर्ड ठेवत असाल तर व्हा सावध, २०१८ मध्ये हॅक झालेल्या पासवर्डची यादी!

Next

(Image Credit : computer-trickster.blogspot.com)

२०१८ मध्ये सर्वात जास्त हॅक झालेल्या पासवर्डचा खुलासा झाला आहे. हा खुलासा सायबर सिक्युरिटी संस्था स्प्लॅशडेटाने केला आहे. हॅक केल्या गेलेल्या पासवर्डच्या यादीत १२३४५६ हे आकडे सर्वात वर आहेत. तर Password हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर होता. हे दोन्ही पासवर्ड टॉपवर असण्याचं हे लगातार पाचवं वर्ष आहे. 

सिक्युरिटी रिसर्चर्स सतत पासवर्डबाबत इशारा देत असतात. तरीही सुद्धा जगभरात लाखो लोक त्यांच्या ई-मेल, स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर आणि दुसऱ्या डिव्हायसेसना सुरक्षित करण्यासाठी कमजोर आणि सहजपणे लक्षात येणारे पासवर्ड ठेवतात. 

सायबर सिक्युरिटी संस्था स्प्लॅशडेटाचा रिसर्च हा हॅक झालेल्या ५० लाख अकाऊंटवर आधारित आहे. संस्थेने २०१८ च्या २५ सर्वात खराब पासवर्डची माहिती जाहीर केली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, गेल्या वर्षभरात जगभरातील १० टक्के लोकांनी पुढील सर्वात खराब पासवर्डपैकी एकाचा वापर केला आहे. स्प्लॅशडेटा सहजपणे हॅक केल्या जाणाऱ्या लाखो पासवर्डचं विश्लेषण करते. 

२५ सर्वात 'खराब' पासवर्ड

या पासवर्डच्या यादीत १२३४५६ आणि Password नंतर तिसऱ्या क्रमांकावर १२३४५६७८९ हा क्रमांक आहे. तेच चौथ्या क्रमांकावर १२३४५६७८, पाचव्या क्रमांकावर १२३४५, सहाव्या क्रमांकावर ११११११, सातव्या क्रमांकावर १२३४५६७ हे पासवर्ड आहेत.

त्यासोबतच सर्वात खराब पासवर्डच्या यादीत sunshine, qwerty, iloveyou, princess, admin, welcome, 666666, abc123, football, 123123, monkey, 654321, !@#$%^&*, charlie, aa123456, donald, password1 आणि qwerty123 यांचा समावेश आहे. 

सायबर सिक्युरिटी संस्थेने सूचना केली आहे की, यूजरने वेगवेगळ्या लॉग-इनसाठी वेगवेगळा पासवर्डचा वापर करावा. अशात हॅकर्स तुमचं अकाऊंट हॅक करणं कठीण होतं. 

Web Title: These are 25 worst password worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.