असुस झेडफोन ५ झेडचे टॉप व्हेरियंट सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 03:11 PM2018-07-30T15:11:30+5:302018-07-30T15:13:06+5:30

असुस कंपनीने आपला झेडफोन ५ झेड हा स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये लाँच केला होता. याचे टॉप व्हेरियंट आजपासून बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे.

These are Asus Zedphone 5 Z Top Variants | असुस झेडफोन ५ झेडचे टॉप व्हेरियंट सादर

असुस झेडफोन ५ झेडचे टॉप व्हेरियंट सादर

Next

असुस कंपनीने आपला झेडफोन ५ झेड हा स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये लाँच केला होता. याचे टॉप व्हेरियंट आजपासून बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे.

असुस झेडफोन ५ झेड या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा, १९:९ अस्पेक्ट रेशोयुक्त फुल एचडी प्लस (२२४६ बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा अद्ययावत प्रोसेसर आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर असुसचा झेनयुआय ५.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. या मॉडेलच्या मागील बाजूस १२ आणि ८ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील पहिल्या कॅमेर्‍यात सोनी आयएमएक्स ३३३ सेन्सर असून यात एलईडी फ्लॅश, एफ/१.८ प्रोसेसर, ८३ अंशातील व्ह्यू दिलेला आहे. तर दुसर्‍या कॅमेर्‍यात एफ/२.२ अपर्चर, १२० अंशातील वाईड अँगल लेन्स दिलेली आहे. यात एफ/२.० अपर्चर, ८४ अंशाचा फिल्ड व्ह्यू युक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यामध्ये असुस बुस्टमास्टर आणि एआय चार्जींग या सुविधांनी युक्त असणारी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली आहे.   

असुस झेडफोन ५ झेड हा स्मार्टफोन ग्राहकांना तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यातील ६ जीबी रॅमचे दोन व्हेरियंट आधीच उपलब्ध करण्यात आले आहेत. तर, आता ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारे मॉडेल आता ३६,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त  फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून सादर करण्यात आला आहे. हे व्हेरियंट ३० जुलैपासून उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत कंपनीने आयसीआयसीआयच्या कार्डवरून याला खरेदी करणार्‍या ग्राहकांना ३ हजार रूपयांपर्यंत कॅशबॅक देण्याचे जाहीर केले आहे. यासोबत नो-कॉस्ट इएमआयची सुविधादेखील दिलेली आहे. याशिवाय, रिलायन्स जिओतर्फे २२०० रूपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि १०० जीबी मोफत डाटा मिळणार आहे.

Web Title: These are Asus Zedphone 5 Z Top Variants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.