5G in India: 5G ची प्रतिक्षा संपणार! दूरसंचार विभागाने या शहरांत थेट लाँचिंगची केली घोषणा, महाराष्ट्राचाही समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 04:41 PM2021-12-27T16:41:39+5:302021-12-27T16:51:04+5:30

5G in India: भारतीय दूरसंचार विभागानं काही देशातील शहरांची नावं सांगतली आहेत, जिथे सर्वप्रथम 5G सेवा उपलब्ध होणार आहे. ही सेवा ट्रायल बेसिसवर नव्हे तर थेट व्यवसायिक तत्वावर उपलब्ध होईल.  

These Big cities in india will be first to get 5g in 2022 says department of telecommunications | 5G in India: 5G ची प्रतिक्षा संपणार! दूरसंचार विभागाने या शहरांत थेट लाँचिंगची केली घोषणा, महाराष्ट्राचाही समावेश 

5G in India: 5G ची प्रतिक्षा संपणार! दूरसंचार विभागाने या शहरांत थेट लाँचिंगची केली घोषणा, महाराष्ट्राचाही समावेश 

Next

5G in India: गेल्या दोन वर्षांपासून भारतात भारतात 5G ची चाचणी सुरु आहे. या चाचण्या पुढील वर्षी मे 2022 पर्यंत सुरु राहतील. भारतात 5G रेडी फोन्स तर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत परंतु 5G नेटवर्कच्या लाँचची वाट मात्र संपूर्ण देश पाहत आहे. आता दूरसंचार विभागानं सांगितलं आहे कि, मेट्रो आणि मोठ्या शहरांमध्ये 5G सर्वप्रथम लाँच करण्यात येईल.  

गुरुग्राम, बेंगळूर, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैद्राबाद आणि पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये सर्वप्रथम 5G उपलब्ध होईल, अशी माहिती भारतीय दूरसंचार विभागानं एका विधानातून दिली आहे. विशेष म्हणजे हे नेटवर्क लाँचिंग ट्रायल म्हणून नव्हे तर व्यावसायिक स्थरावर करण्यात येईल. म्हणजे ग्राहक वेगवान कनेक्टिव्हिटीचा आनंद पुढील वर्षी घेऊ शकतील.  

गुरुग्राम, बेंगळूर, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैद्राबाद आणि पुणे या शहरांमध्ये गेले दोन वर्ष टेलिकॉम कंपन्या चाचण्या करत आहेत. यात वोडाफोन-आयडिया, जियो आणि एयरटेल या तिन्ही महत्वाच्या कंपन्यांचा समावेश आहे. थेट ग्राहकांना उपलब्ध होणारं 5G नेटवर्क महाग असेल कि नाही, यावर मात्र चर्चा सुरु झाली आहे. या वेगवान कनेक्टिव्हिटीच्या किंमतीचा अंदाज पुढील वर्षी होणाऱ्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर लावता येईल. हा लिलाव मार्च-एप्रिल 2022 दरम्यान होईल, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमधून मिळाली आहे.  

हे देखील वाचा: 

खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

Web Title: These Big cities in india will be first to get 5g in 2022 says department of telecommunications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.