फोनवरील या छोट्या लाईन्स खूप कामाच्या, तुमच्या आहेत का? जाणून घ्या त्यांचा उपयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 09:29 AM2022-03-27T09:29:13+5:302022-03-27T09:29:52+5:30
Lines On smartphone Body: आताच्या फोनमधून त्या लाईन गायब झाल्या आहेत. त्यांचा उपयोग काय असतो? कशासाठी देतात त्या लाईन बॉडीवर.... चला जाणून घेऊया.
गेल्या काही वर्षांत आपण स्मार्टफोनचे अनेक मॉ़डेल्स पाहिले आहेत. काही दशकांपूर्वी तर फोनवर एक काठी असायची. रेंज घेण्यासाठी ती आता लुप्तच झाली आहे. आता सारेच फोन एकसारखे दिसतात. कंपन्या भारंभार आणि फोन एकसारखे, परंतू काही फोनमध्ये बॉडीवर चारही बाजुंना वरील फोटोत दाखविल्या प्रमाणे लाईन असतात. त्याचा फायदा मोठा आहे, त्या नसतील तर तुमचा स्मार्टफोन बेकार आहे.
आताच्या फोनमधून त्या लाईन गायब झाल्या आहेत. त्यांचा उपयोग काय असतो? कशासाठी देतात त्या लाईन बॉडीवर.... चला जाणून घेऊया.
अशा लाईन्स असलेले स्मार्टफोन अधून मधून येत असतात. तुम्ही काही वर्षांपूर्वी या लाईन्स अॅपलच्या फोनवर पाहिल्या असतील. त्या लाईन्सचा वापर सिग्नल म्हणजेच रेंज पकडण्यासाठी होतो. त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या अँटिना लाईन्स असतात. या लाईन्स छोट्या खिडक्यांसारखे काम करतात. म्हणजे मजबूत सिग्नल स्मार्टफोनला मिळावेत, असा त्याचा उद्देश असतो.
या खिडक्या रेडीओ वेव्ह्जसाठी असतात. तुमच्या फोनमध्ये ब्लूटूथ, वाय फाय आणि LTE/5G अँटिनाकडून ज्या वेव्हज येतात त्या तुमच्या फोनला इंटरनेटशी जोडतात. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाईट असतात ज्या तुमच्या फोनला एक खरेखुरे कम्युनिकेशन डिव्हाईस बनवितात.
आताच्या फोन्समधून गायब....
आता तुम्ही म्हणाल की, आमच्या फोनवर नाहीत. कारण तुमचे फोन हे प्लॅस्टिक ब़ॉडीचे आहेत. प्लास्टिक हे या वेव्हजसाठी खूप ट्रान्सपरंट आहे. काच प्लॅस्टिकएवढ्या रेडिओ वेव्हज आत पाठवत नाही. यामुळे दोन्ही बाजुला काच असेल तर आतील बॉडी ही मेटल असते, त्याला छोट्या छोट्या अंटिना लाईन असतात.
तुम्हाला फोनवर बोलताना किंवा रेंजची जी समस्या येते त्याचे हे मुख्य कारण आहे. या अंटिना लाईनवर किंवा प्लॅस्टिक बॉडीवरील भागावर जर तुमचा हात आला तर सिग्नल्स कमी प्रमाणात मिळू लागतात. यामुळे गेम खेळताना, चॅटिंग करताना किंवा व्हिडीओ पाहताना तुम्ही या अंटिना लाईन हाताने कव्हर करत आहेत का हे पहावे. महत्वाचे म्हणजे या लाईन डिझाईनचा भाग कधीही नसतात.