सहलीला जाताय... 'ही' स्मार्ट ट्रॅव्हल गॅजेट्स करतील तुमचा प्रवास सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2023 03:01 PM2023-01-04T15:01:34+5:302023-01-06T10:30:38+5:30

प्रत्येक सहलीच्या वेळी तुमच्यासोबत काही खास अ‍ॅक्सेसरीज असायलाच हव्यात, पाहा ती यादी

these smart travel gadgets make your journey pleasant | सहलीला जाताय... 'ही' स्मार्ट ट्रॅव्हल गॅजेट्स करतील तुमचा प्रवास सुखकर

सहलीला जाताय... 'ही' स्मार्ट ट्रॅव्हल गॅजेट्स करतील तुमचा प्रवास सुखकर

googlenewsNext

>> जयंती मधुकर

कंटाळा आला की प्रवास केलाच पाहिजे, म्हणजे मनावर आलेली मरगळ लगेच निघून जाते असं म्हणतात. त्यातही प्रवासात किंवा सहलीत कॅमेरा, चार्जर आणि यूएसबी चार्जर यासारखी गॅझेट अ‍ॅक्सेसरीजसह असतील तर प्रवासाची मजा आणखी वाढते. तुम्ही विमानाने जात असाल, ट्रेनने जात असाल किंवा ड्रायव्हिंग करत असाल तर त्यावेळी तुम्हाला आवश्यक असलेले स्मार्ट ट्रॅव्हल गॅजेट्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भारतात असो किंवा परदेशात असो, प्रवासात ही गॅझेट्स तुमच्याकडे असायलाच हवीत. क्रोमा- हे सर्व प्रकारच्या गोष्टी मिळण्याचं एक ठिकाण आहे. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक्स आणि सर्व प्रवासी सामानासाठी तुम्ही क्रोमाला नक्कीच भेट द्यायला हवी.

कोणत्याही प्रवासात योग्य पॅकिंग करणं म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी सामानात असणे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी वजनाने हलक्या, पण कामी येणाऱ्या अशा काही गॅझेट्स सूचवत आहोत.

ट्रायपॉडसह क्रोमा सेल्फी स्टिक (Croma Selfie Stick with Tripod)

फोटो काढले नाहीत तर सुट्टीची काय मजा? उत्कृष्ट फोटोंसाठी एक विश्वासार्ह गॅझेट म्हणजे ट्रायपॉडसह क्रोमाची सेल्फी स्टिक (Croma’s selfie stick with tripod). त्याची वैशिष्ट्ये अतिशय प्रभावी आहेत. विशेषत: ते सुपर एक्सपांडेबल आहे. सेल्फी स्टिक छोटी ठेवून तुम्ही क्लोज शॉट्ससाठी वापर करू शकता किंवा स्टिकची लांबी वाढवून निसर्गरम्य फोटो व वाइड-एंगल शॉट्स घेऊ शकता. ५.५ सेमी ते ९ सेमी पर्यंतच्या सर्व iOS आणि Android स्मार्टफोनला ही सेल्फी स्टिक सपोर्ट करते.

आम्ही हे गॅझेट मुद्दाम हलकं आणि पोर्टेबल ठेवलं आहे, जेणेकरून निवडले आहे – तुम्ही ते तुमच्या प्रवासाच्या सामानात ते सहजपणे फोल्ड करून घेऊन जाऊ शकता. या स्टिकची भार घेण्याची क्षमता ३,००० ग्रॅम आहे आणि याला ब्लू-टूथ कनेक्टिव्हिटीही आहे. हे एका महिन्याच्या वॉरंटीसह येते.
किंमत: रु. १,५९९ (सर्व करांसह)

कॅमेऱ्यांसाठी क्रोमा अ‍ॅडजस्टेबल १३४ सेमी ट्रायपॉड (Croma Adjustable 134 cm Tripod for Cameras)

तुम्ही एक मजबूत ट्रायपॉड शोधत असाल जो तुम्हाला उत्तम फोटो काढण्यात मदत करू शकेल, तर कॅमेऱ्यासाठी क्रोमाचा अ‍ॅडजस्टेबल १३४ सेमी ट्रायपॉड (Croma’s Adjustable 134 cm Tripod for Camera ) ही एक उत्तम अ‍ॅक्सेसरी आहे. हा ट्रायपॉड वजनाने हलका तसाच मोबाईल आणि कॅमेरासाठी योग्य आहे. डिजिटल कॅमेर्‍यासाठी युनिव्हर्सल स्क्रू माउंट आणि ४-सेक्शन मल्टी-फंक्शन्स ही त्याची वैशिष्ट्ये आहे. बाजारात असलेल्या ट्रायपॉड्समध्ये ही वैशिष्ट्ये सर्वोत्तम आहेत. हा ट्रायपॉड अ‍ॅडजस्टेबल तर आहेच पण त्यासोबत याला १२ महिन्यांची वॉरंटीही आहे. त्यामुळे फोटोग्राफर्सकडे ही अ‍ॅक्सेसरी असायलाच हवी.
किंमत: रु. १,९९९ (सर्व करांसह)

कॅमकॉर्डर DSLR अ‍ॅक्शन कॅमेरा आणि मोबाईल फोनसाठी क्रोमा अ‍ॅडजस्टेबल १२८ सेमी ट्रायपॉड (Croma Adjustable 128 cm Tripod for Camcorder DSLR Action Camera and Mobile Phone)

सोशल मीडियासाठी दर्जेदार सामग्रीच्या आजच्या काळात, फोटोग्राफर्सना उच्च-गुणवत्तेचे नाविन्यपूर्ण फोटो घेणे आवश्यक आहे. बहुतेक प्रोफेशनल फोटोग्राफर उत्तम फोटो काढण्यासाठी त्यांच्या ट्रायपॉडवर प्रचंड विश्वास टाकतात. कॅमकॉर्डर डीएसएलआर अ‍ॅक्शन कॅमेरा आणि मोबाइल फोनसाठी क्रोमाचा १२८ सेमीचा अ‍ॅडजस्टेबल ट्रायपॉड (Croma Adjustable 128 cm Tripod for Camcorder DSLR Action Camera and Mobile Phones) ही अशीच एक अ‍ॅक्सेसरी आहे. यात उंचीची अ‍ॅडजस्टमेंट, मल्टिपल लेयर लॉकिंग आणि ट्रायपॉड मजबूत राहावा म्हणून रबराचे पाय असे चार विभाग आहेत. रबराचे पाय ट्रायपॉड शक्य तितका स्थिर राहील याची काळजी घेतात. तुम्ही जसा फोटो काढायचा असेल त्याप्रकारे कॅमेरासह ट्रायपॉड पॅन कॅन करण्यासाठी ३-वे हेड आहे. युनिव्हर्सल स्क्रू माउंट अनेक स्मार्टफोन्स, डिजिटल कॅमेरे, स्टिल कॅमेरे, गो प्रो गियर आणि व्हिडिओ कॅमेर्‍यांना फिट बसतात आणि योग्य कार्य करतात.

ट्रायपॉडमध्ये इंटिग्रेटेड बबल हेड आहे, ज्यामुळे तुम्ही आडवा ठेवलेल्या कॅमेराचा अँगल नीट ठेवू शकता. आणि आम्हाला आवडणारे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे या ट्रायपॉडचे पाय कमी-जास्त करता येत असल्याने लॅम्प पोस्ट्स, कुंपण, झाडाच्या फांद्या, दरवाजाच्या नॉबवर आणि कोणत्याही पृष्ठभागावर ट्रायपॉड हवा तेवढा गुंडाळण्याची मुभा वापरणाऱ्याला मिळते. याला १२ महिन्यांची वॉरंटी आहे.
किंमत: रु. १,९९९ (सर्व करांसह)

क्रोमा ड्युअल पोर्ट यूएसबी आणि टाइप-सी वॉल चार्जिंग अ‍ॅडॅप्टर (Croma Dual Port USB & Type-C Wall Charging Adapter)

अनेक चार्जर घेऊन जाण्याऐवजी, ड्युअल पोर्ट वॉल चार्जर अ‍ॅडॅप्टर वापरून अनेक डिव्हाईस पटकन चार्ज होऊ शकतात. अशा ट्रॅव्हल अ‍ॅक्सेसरीसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे क्रोमा ड्युअल पोर्ट यूएसबी आणि टाइप-सी वॉल चार्जिंग अडॅप्टर. हे तुमच्या समोरील इलेक्ट्रिकल आउटलेटशी जुळवून घेण्यासाठी प्लगचा आकार बदलू शकते. क्रोमाचे ड्युअल पोर्ट यूएसबी आणि टाइप-सी वॉल चार्जिंग अ‍ॅडॅप्टर (Croma Dual Port USB & Type-C Wall Charging Adapter) मोबाइल, टॅब्लेट, कॅमेरा, MP3 आणि MP4 प्लेअरसाठी उत्तम आहे. तुम्ही एका देशाचे ड्युअल-व्होल्टेज उपकरण किंवा कन्व्हर्टर दुसऱ्या देशाच्या वॉल आउटलेटमध्ये प्लग करू शकता. यूके, युरोप, यूएसए आणि ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंडमध्ये प्रवास करत असल्यास हे विशेषतः उपयुक्त आहे. हे भारतातही वापरले जाऊ शकते कारण ते भारतीय प्लग अ‍ॅडॅप्टरसह येते, म्हणूनच विचार करून विकत घेऊन टाका आणि भारतात चार्जिंग करण्याची चिंता बिलकुल न करता तुम्हाला पाहिजे तेथे खरेदी करा.

हे हलके आहे आणि कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये येते. दोन यूएसबी पोर्ट आणि दोन टाइप-सी पोर्ट आणि १००-२५० व्होल्ट अशी याची वैशिष्ट्ये आहेत. हे 6 महिन्यांच्या वॉरंटीसह येते.
किंमत: रु. १,९९९ (सर्व करांसह)

क्रोमा 1 Amp युनिव्हर्सल अ‍ॅडॅप्टर (Croma 1 Amp Universal Adapter)

परदेशात प्रवास करताना अ‍ॅडॅप्टरच्या गरजेवर आपण पुरेसा भर देऊ शकत नाही. पण या साध्या अ‍ॅक्सेसरीशिवाय, तुमचा मोबाइल फोन किंवा लॅपटॉप चार्ज करणे हे अतिशय कठीण बनते. विशेषत: विमानतळावरील लेओव्हर दरम्यान ही गोष्ट जाणवते. अशा वेळी मोबाइल आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी उपयुक्त असलेल्या एका यूएसबी पोर्टसह क्रोमाच्या 1 Amp युनिव्हर्सल अ‍ॅडॅप्टरचा तुम्ही नक्कीच विचार करायला हवा. हे इनपुट व्होल्टेजसह येते. हे १०० व्होल्ट ते २५० व्होल्ट पर्यंत असते. त्यामुळे ते तुमच्या यूएसबी अनुकूल उपकरणांमध्ये चार्जिंगला नक्कीच उपयुक्त ठरेल.
यामध्ये LED इंडिकेटरचा समावेश आहे. त्यामुळे सिस्टीममध्ये उरलेली बॅटरी किती आहे, हे समजण्यास करण्यास मदत होते. या अ‍ॅक्सेसरीसह प्रवास नक्कीच विनासायास होईल आणि ही अ‍ॅक्सेसरी सहजपणे तुमच्या खिशातही मावेल.
करंट: 1 Amp.
किंमत: ४९९ रुपये (सर्व करांसह)

Croma 2.1 Amp युनिव्हर्सल ड्युअल यूएसबी वॉल चार्जिंग अ‍ॅडॅप्टर (Croma 2.1 Amp Universal Dual USB Wall Charging Adapter)

कनेक्टिव्हिटीच्या काळात, अशी काही उपकरणे आहेत जी आपण कायम सोबत ठेवतो. फोन, लॅपटॉप, टॅबलेट, किंडल आणि असे बरेच डिव्हाईस कायम आपल्या बरोबरच असतात. Croma 2.1 Amp युनिव्हर्सल ड्युअल यूएसबी वॉल चार्जिंग अ‍ॅडॅप्टर (The Croma 2.1 Amp Universal Dual USB Wall Charging Adapter) एकाच वेळी एकापेक्षा जास्त डिव्हाईसला जोडण्यासाठी उपयुक्त आहे. याचे दोन यूएसबी पोर्ट तुमच्याकडच्या दोन डिव्हाइसना एकत्र जोडता येऊ शकतात. हे अल्टरनेट करंट आउटलेटद्वारे तयार केले गेले आहे. त्यामुळे सुरक्षा आणि कम्पॅटिबिलिटीची खात्री मिळते.

हे वापरण्यास सोपे आणि कॉम्पॅक्ट आहे त्यामुळे ते तुमच्यासोबत नेणे खूप सोयीचे आहे. याला ६ महिन्यांची वॉरंटी असते.
किंमत: रु. ९९९ (सर्व करांसह)

क्रोमा १२ वॅट्स २ यूएसबी पोर्ट्स कार चार्जिंग अ‍ॅडॅप्टर (Croma 12 Watts 2 USB Ports Car Charging Adapter)

रोड ट्रिपला जात आहात? मग तर तुम्ही क्रोमाचा १२ वॅट्स २ यूएसबी पोर्ट्स कार चार्जिंग अ‍ॅडॅप्टर (with Croma’s 12 Watts 2 USB Ports Car Charging Adapter) सोबत घेतलाच पाहिजे. हा चार्जर सिगारेट लाइटर प्लगमध्येही कनेक्ट करता येतो आणि त्याच्या प्लास्टिक मटेरियलमुळे सतत चार्जिंग पुरवतो. तुम्ही एकाच वेळी याने दोन गॅझेट चार्ज करू शकता. त्याच्या ड्युअल-पोर्ट यूएसबीमुळे ते मोबाईल, स्मार्टवॉच आणि TWS साठी कम्पॅटिबल आहेत. हे १२ वॅट्सच्या एकूण आउटपुटसह येते. त्यामुळे विद्युत प्रवाहातील अनियमितता, ओव्हरहिट आणि ओव्हरचार्जिंग हे धोके बिल्ट-इन फिचर्समध्येच नष्ट केले जातात.

हे आतापर्यंतचे सर्वात लहान यूएसबी वाहन चार्जर असले तरी ते वेगवान, कॉम्पॅक्ट आणि हलके आहे.
किंमत: १९९ रुपये

क्रोमा ३८ वॅट्स २ यूएसबी पोर्ट्स कार चार्जिंग अ‍ॅडॅप्टर (Croma 38 Watts 2 USB Ports Car Charging Adapter)

काही अतिरिक्त वैशिष्ट्यांसह, क्रोमाचे ३८ वॅट्स २ यूएसबी पोर्ट्स कार चार्जिंग अ‍ॅडॅप्टर (Croma’s 38 Watts 2 USB Ports Car Charging Adapter) हे वायरलेस इअर बड्स, टॅब्लेट, ई-रीडर, स्मार्ट घड्याळे, फिटनेस बँड आणि मोबाईलसाठी उपयुक्त आहेत. तुम्ही तुम्हाला हवे असलेले सर्व गॅझेट कॅरी करू शकता. आणि त्यासाठी वेगवेगळे चार्जर सोबत घेण्याचीही गरज नाही. क्विक चार्ज (QC) तंत्रज्ञान आणि पॉवर डिलिव्हरी (PD) तंत्रज्ञानासह असलेल्या या चार्जरमध्ये एकूण ३८ वॅट्सची उर्जा आणि सामान्य चार्जरपेक्षा तिप्पट चार्जिंग कार्यक्षमता आहे. हे १२ महिन्यांच्या वॉरंटीसह येते.
किंमत: ४९९ रुपये (सर्व करांसह)

Web Title: these smart travel gadgets make your journey pleasant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.