या स्मार्टफोनना मिळू लागले नवेकोरे अँड्रॉईड १४; तुम्ही अपडेट चेक केलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 06:32 PM2023-10-05T18:32:49+5:302023-10-05T18:33:15+5:30
तुम्हालाही तुमच्या हातातील स्मार्टफोन कंपन्यांनी दोन-चार वर्षांची अँड्रॉईड अपडेट देऊ असे सांगितले असेल. तुम्हीही नवीन अपडेटची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
गुगलने नवीन पिक्सल ८ सिरीज सोबत अँड्रॉईड १४ अपडेट देखील लाँच केली आहे. तुम्हालाही तुमच्या हातातील स्मार्टफोन कंपन्यांनी दोन-चार वर्षांची अँड्रॉईड अपडेट देऊ असे सांगितले असेल. तुम्हीही नवीन अपडेटची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. परंतू, पिक्सल वाल्यांसाठी तर आनंदाच्या उकळ्या फोडणारी बातमी आहे.
सुरुवातीला गुगलच्या पिक्सल सिरीजवर Android 14 ची अपडेट येणार आहे. काहींना ती मिळायलाही सुरुवात झाली आहे. लेटेस्ट व्हर्जनमध्ये तुम्हाला चांगली सुरक्षा आणि एक्सेसबिलिटी फिचर्स दिले जाणार आहेत.
यामध्ये कंपनीने जनरेटीव्ह एआय टूल्सला जोडले आहे. तुम्ही यामध्ये युनिक लॉक स्क्रीन वॉलपेपर बनवू शकणार आहात. पिक्सलला अँड्रॉईड १४ मिळत असताना दुसऱ्या कंपन्यांनी अद्याप यावर काही माहिती दिलेली नाहीय. यामुळे सॅमसंग, ओप्पो, वनप्लस, व्हिवो सारख्या कंपन्यांच्या ग्राहकांना पुढील एक दोन महिने वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.
Pixel 4a, Pixel 5, Pixel 5a, Pixel 6, Pixel 6 Pro, Pixel 6a, Pixel 7, Pixel 7 Pro, Pixel 7a आणि Pixel Fold ला Android 14 लेटेस्ट सॉफ्टवेअर मिळणार आहे. सध्या Pixel 8 आणि Pixel 8 Pro मध्येच अँड्रॉईड १४ देण्यात आले आहे.
तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही नवीनतम अपडेट डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकता.