व्हॉट्सअॅप आणतंय हे दोन जबरदस्त फिचर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 07:48 AM2017-11-19T07:48:15+5:302017-11-19T07:53:42+5:30
आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने भन्नाट फीचर आणले आहे.
नवी दिल्ली - आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने भन्नाट फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे कॉल सुरु असताना वॉईस कॉल की व्हिडिओ कॉल असा पर्याय उपलब्ध होणार आहे तर दुसऱ्या फिचरमध्ये व्हाट्सअॅप व्हाईस कॉल रेकॉर्ड करणे सोपे होणार आहे. हे दोन्ही फिचर्स अॅंड्रॉईडवरच लागू होणार आहेत. व्हॉट्सअॅप सध्या दोन नव्या फिचर्ससाठी काम करीत आहे. सध्या व्हॉट्सअॅपकडून या नव्या फीचरची चाचपणी सुरु असून अँड्रॉईडच्या बिटा व्हर्जनवर तपासलं जात आहे. लवकरच हे फीचर तुमच्या-आमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर लाँच होण्याचा अंदाज आहे.
चाचणी सुरू
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ-व्हॉईस कॉल संदर्भात व्हॉट्सअॅप टीमची सध्या चाचपणी सुरू आहे. सुरु असलेला कॉल बंद न करता त्याला व्हिडिओ कॉलमध्ये रुपांतरीत करता येणार आहे. जुलै महिन्यात यासंबधी प्रथम चाचणी करण्यात आली होती. या फिचरची चाचणी झाली असून याचा वापर कसा करायचा यासंबधी स्क्रीनशॉटही पाठविण्यात येणार आहेत.
तरच व्हिडिओ कॉल
कॉल उचलल्यास व्हॉइस कॉल हा अचानक व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करणार नाही. समोरच्या व्यक्तीला यासंबंधी गेलेली रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतरच व्हिडिओ कॉल सुरू होऊ शकेल.
रेकॉर्ड व्हॉईस कॉल
व्हॉईस मेसेजसाठी व्हॉट्सअॅप एक नवे फिचर आणत आहे. फोन कॉल सुरु असताना किंवा संपल्यावर एक ऑप्शन युजरसमोर येईल. कॉल वर बोलायचे किंवा कॉल रेकॉर्ड करायचा याची निवड यातून युजरला करता येणार आहे. त्यामूळे रेकॉर्ड झालेला वॉईस कॉल नंतरही ऐकता येणार आहे.
WhatsApp वर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!
नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन कंटेंटमध्ये वाचता येतील. तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आला असेल तरीही तो वाचला जाऊ शकेल. याशिवाय कोणत्याही अतिरिक्त अॅप ऐवजी नोटिफिशेकचा वापर करु शकतो. तसेच, फोनच्या होमस्क्रीन बटनवर जास्तवेळ प्रेस केल्यानंतर Widgets > Activities > Settings > Notification log येऊ शकते. मात्र, फोन एकदा रिस्टार्ट केला असेल तर मेसेज वाचता येणार नाहीत. जास्तीत जास्त 100 अक्षरे वाचता येऊ शकतील.
‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फीचर...
व्हॉट्सअॅपच्या ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ या नव्या फीचरची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएसमध्ये देण्यात आले आहे. या फीचरमध्ये चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना रिकॉल करता येतो. तुम्ही पाठविलेला मेसेज जर डिलिट करायचा असेल तर त्या मेसेजवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तेथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील. जर तुम्ही पहिला पर्याय निवडला तर तो मेसेज फक्त तुमच्या फोनमधून म्हणजेच तुमच्या पुरता डिलिट होईल. कॅन्सल निवडले तर मेसेज डिलिट होणार नाही. पण जर डिलिट फॉर एव्हरिवन हा पर्याय निवडला तर तो मेसेज तुमच्या तसेच रिसिव्हरच्या चॅट बॉक्समधून डिलिट होईल.