सावधान! ५ सेकंदात चोरी होऊ शकतात ५ लाख रुपये; स्मार्टफोनवर चुकूनही असं करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:16 PM2022-11-09T12:16:39+5:302022-11-09T12:17:03+5:30

सध्याच्या जगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

Things That You Should Never Do With Your Smartphone You Might Get Robbed | सावधान! ५ सेकंदात चोरी होऊ शकतात ५ लाख रुपये; स्मार्टफोनवर चुकूनही असं करू नका

सावधान! ५ सेकंदात चोरी होऊ शकतात ५ लाख रुपये; स्मार्टफोनवर चुकूनही असं करू नका

googlenewsNext

नवी दिल्ली-

सध्याच्या जगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. बातम्या पाहायच्या  असतील किंवा सोशल मीडियावर काही शोध घ्यायचा असेल तर आपल्या सर्वांना इंटरनेटची रोजची गरज भासते. डिजिटल जग जितके उपयुक्त आहे तितकेच ते धोकादायक देखील आहे. त्याचे अनेक नकारात्मक पैलू देखील आहेत. एक छोटीशी चूक आणि तुमच्या खात्यातून अवघ्या ५ सेकंदात ५ लाख रुपये जाऊ शकतात. 

भारतात २०२२ च्या अखेरीस ८४ कोटी इंटरनेट युझर्स होतील, जे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के इतकं आहे. इंटरनेटशी जोडलेली प्रत्येक व्यक्ती दररोज सुमारे २.५ तास व्यतित करते. आपल्या सर्वांचं फोनवर अवलंबून राहणं, सोशल मीडिया आणि इंटरनेटचं व्यसन प्रचंड वाढलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जितकं आपण या गोष्टींवर अवलंबून राहू तितकाच सायबर सुरक्षेचा धोकाही वाढणार आहे. कोविडमुळे ऑनलाइन व्यवहारांना चालना मिळाली असून त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बँकिंगपासून ऑनलाइन शॉपिंगपर्यंत, औषधांपासून रेशनपर्यंत आपण तंत्रज्ञानावर अवलंबून झालो आहोत.

स्केअरवेअरचा वापर
स्केअरवेअरद्वारे हॅकर्स पीडितांना खोटे अलार्म आणि नोटिफिकेशन पाठवतात. त्यांना त्यांच्या सिस्टमवर मालवेअरचा फटका बसल्याचं सांगण्यात येतं. युझर्स या नोटिफिकेशनला घाबरतात आणि घाईघाईनं असे सॉफ्टवेअर डाऊनलोड करतात जे मालवेअर असू शकतं. Scareware हा एक कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो युझर्सना अनावश्यक प्रोग्राम खरेदी करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वापरला जातो. यामुळे तुमचे डिव्हाइस व्हायरसने प्रभावित होते आणि तुमचे सर्व तपशील हॅकर्सकडे जाऊ लागतात.

फसवणूक करणाऱ्यांची हुशारी
तु्म्हाला लॉटरी लागली आहे किंवा तुमचे नाव लकी ड्रॉमध्ये आले आहे, अशा वेगवेगळ्या सबबी हॅकर्स तुम्हाला अनेकदा देतात. तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात की ते तुमच्या बँकेचा पासवर्ड, OTP किंवा KYC तपशील मिळतात. जसं जसं आपण तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून राहू त्याच प्रमाणात आपल्याला अधिक चांगल्या ऑनलाइन सुरक्षा सिस्टम तयार करणं देखील आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणूक गुन्हे हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इंटरनेट सावधगिरीनं वापर हाच आहे.  अशा घटनांना बळी पडण्यापासून स्वत:ला वाचवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे सतर्क राहणे आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडणे.

Web Title: Things That You Should Never Do With Your Smartphone You Might Get Robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.