सावधान! 'हा' व्हायरस हॅक करतोय Facebook आणि Google अकाऊंट, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 12:03 PM2022-02-26T12:03:12+5:302022-02-26T12:15:25+5:30

Malware : याबाबत रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, यामुळे 5000 डिव्हाइसवर परिणाम झाला आहे.

this malware can take control of your facebook and google account | सावधान! 'हा' व्हायरस हॅक करतोय Facebook आणि Google अकाऊंट, जाणून घ्या सविस्तर...

सावधान! 'हा' व्हायरस हॅक करतोय Facebook आणि Google अकाऊंट, जाणून घ्या सविस्तर...

Next

एका नवीन मालवेअर इलेक्ट्रॉन बॉटबद्दल (Electron Bot) इशारा देण्यात आली आहे. हा मालवेअर तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्सला प्रभावित करू  शकतो. एका रिपोर्टनुसार, Electron Bot मालवेअर फेसबुक (Facebook) आणि गुगल (Google) वरील तुमच्या अकाउंट्सचे अॅक्सेस घेत आहे.

चेक पॉईंट रिसर्चने (Check Point Research) याबाबत माहिती दिली आहे. या मालवेअरबाबत डिटेल्स रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. टेम्पल रन (Temple Run) आणि सबवे सर्फर (Subway Surfer) सारख्या लोकप्रिय गेम्सच्या क्लोनमध्येही हा मालवेअर दिसला आहे. जर सायबर हल्लेखोरांना वाटते की, तुमच्या डिव्हाइसमध्ये हा मालवेअर आला असेल तर ते तुमच्या डिजिटल लाइफवर सहज कंट्रोल करू शकतात.

याबाबत रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, यामुळे 5000 डिव्हाइसवर परिणाम झाला आहे. हा मालवेअर केवळ तुमच्या सिस्टीमचा कंट्रोल घेत नाहीतर तुमच्या Facebook आणि Google वरील सोशल मीडिया अकाऊंट्सचा सुद्धा अॅक्सेस घेतो. हा मालवेअर नवीन अकाउंट्स रजिस्टर करू शकतो. याशिवाय, तो लॉग इन करून इतर पोस्टवर लाईक आणि कमेंट करू शकतो.

मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये (Microsoft store) असलेल्या अॅपमध्ये हा मालवेअर दिसला आहे. चेक पॉइंट रिसर्चने मायक्रोसॉफ्टला या मालवेअरबद्दल सांगितले आहे. गुगल फोटो अॅपच्या अल्बममध्येही (Album by Google Photos) हा मालवेअर दिसल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. जो Google LLC ने प्रकाशित केल्याचा दावा केला होता.

दरम्यान, बहुतेक प्रकरणांमध्ये, लोकांना अज्ञात सॉफ्टवेअर किंवा सोर्सकडून अॅप्स डाउनलोड करू नका असे सांगितले जाते. परंतु, या प्रकरणात मायक्रोसॉफ्ट स्टोअर (Microsoft Store) एक विश्वासार्ह सोर्स आहे. यामुळे कोणताही मालवेअर पोहोचला तर लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि जाणूनबुजून किंवा नकळत त्यांच्या सिस्टमला परिणाम करतात. Electron Bot च्या बाबतीतही असेच घडले. हे टाळण्यासाठी, हे अॅप्स तुमच्या डिव्हाइसमधून हटवा आणि अशी अॅप्स डाउनलोड करणे टाळा.

Web Title: this malware can take control of your facebook and google account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.