मेटाने लॉन्च केले Threads App, Twitter शी थेट स्पर्धा; जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 05:40 PM2023-07-06T17:40:38+5:302023-07-06T17:41:07+5:30
Threads App Launched: फेसबूकची पॅरेंट कंपनी मेटाने ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स अॅप लॉन्च केले आहे.
Threads App Launched: फेसबूकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांच्याशी थेट टक्कर घेतली आहे. फेसबूकची पॅरेंट कंपनी मेटाने ट्विटरप्रमाणे 'थ्रेड्स' नावाचे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपकडे ट्विटरचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. या अॅपमध्येही Twitter सारखे सर्व फीचर्स दिले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये पोस्टची मर्यादा 500 शब्दापर्यंत आहे, जी ट्विटरच्या 280 शब्द मर्यादेपेक्षा जास्त आहे. याशिवाय, यात पाच मिनिटांपर्यंतच्या लिंक्स, फोटो आणि व्हिडिओही पोस्ट करू शकतात.
हे अॅप US, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानसह 100 हून अधिक देशांमध्ये Apple आणि Google Android App Store वर उपलब्ध झाले आहे. यूजर्स अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरुन थ्रेड्स अॅप इन्स्टॉल करू शकतात.
✨ Threads is here – a new app where you can share updates and join convos ✨
— Instagram (@instagram) July 5, 2023
Use your Instagram account to log in and get started 🎉 https://t.co/eEyTigO7WBpic.twitter.com/mCNsx33ZVg
थ्रेड्स अॅपचे फीचर्स
थ्रेड्स इंस्टाग्रामचेच दुसरे अॅप आहे, ज्यामध्ये युजर्स टेक्स्ट, लिंक शेअर करणे, इतर युजर्सच्या मेसेजला उत्तर देणे आणि ट्विटरप्रमाणे इतर सर्व गोष्टी करू शकतील. या अॅपवर लॉगइन करण्यासाठी युजर्स आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या युजरनेमचा वापर करू शकतात. यासाठी वेगळ्या युजरनेमची गरज नाही.
ट्विटरशी थेट स्पर्धा
या अॅपमध्येही ट्विटरप्रमाणेच पोस्ट करणे, कमेंट करणे, रिशेअर करणे, इत्यादीप्रकारचे सर्व फीचर्स दिले आहेत. सध्या ट्विटरचा युजरबेस खूप आहे, अशा परिस्थितीत या अॅपला ट्विटरचा स्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. युजर्सना या अॅपमध्ये ट्विटरसारखे सर्व फीचर्स मिळत असल्यामुळे, या अॅपची थेट ट्विटरशी स्पर्धा असेल.