नव्या बदलाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 06:15 AM2017-12-31T06:15:35+5:302017-12-31T06:15:45+5:30

तंत्रज्ञान क्षेत्रातील बरेचसे बदल हे पटकन कालबाह्य होतात. तर काही बदल हे आपण राहत असलेल्या जगाला, जगण्याला अंतर्बाह्य बदलून टाकतात. येणाºया वर्षातही जागतिक पातळीवर असे अनेक बदल अपेक्षित आहेत. तंत्रज्ञानाच्या या उंबरठ्यावर काही बदल आपल्याला कायमस्वरूपी बदलाच्या वाटेने घेऊन जाऊ शकतात....

 On the threshold of a new change | नव्या बदलाच्या उंबरठ्यावर

नव्या बदलाच्या उंबरठ्यावर

googlenewsNext

- तुषार भामरे


आयओटी व स्मार्ट होत चाललेली डिव्हायसेस
२०२० पर्यंत जगातल्या २५% कार या इंटरनेटने जोडलेल्या असतील व या कार्सना आपल्या प्रवासाच्या सवयी, आवडीनिवडी असे बरेच काही माहीत असेल. हे शक्य होतेय ते इंटरनेट आॅफ थिंग्स (आयओटी) व स्मार्ट डिव्हायसेसमुळे. हे फक्त कार्सपुरते मर्यादित नाही. आजच्या घडीला आपण स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही अशी अनेक डिव्हायसेस वापरतो. पुढे ती अधिक स्मार्ट होऊन आपल्या दैनंदिन सवयी बदलायला भाग पाडतील.

स्मार्ट यंत्रे/ आॅटोमेशन :
यंत्रे जेवढी स्मार्ट होतील तितके जास्त काम ते आपल्यासाठी करू शकतील. अल्गोरिदम किंवा रोबोट्सच्या साहाय्याने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय विविध प्रक्रिया, निर्णय, कार्ये, विविध प्रणाली अचूकपणे राबवता येतील. अर्थात यामुळे आॅटोमेशनच्या पहिल्या लाटेत डल, डर्टी, डेंजरस आणि डिअर या ‘चार डी’ प्रकारातील नोकºयांवर कुºहाड येईल. मानवापेक्षा सरस, कमी किमतीत, अचूकपणे आणि सुरक्षितरीत्या यंत्रे काम करायला सुरुवात झाली आहे.


आपल्या जगण्याचे डाटाफिकेशन
स्मार्टफोनवर म्युझिक ऐकणे, जेवण आॅर्डर करणे, खरेदी करणे अशा गोष्टी करताना आपण आपले ‘डाटा ब्रेडक्रंब्स’ वापरलेल्यापैकी थोडीशी माहिती उरवून पुढे जातो. या उरलेल्या ब्रेडक्रंब्समुळे माहिती साठून राहते. प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणेही आपण बरीचशी माहिती सेवा प्रदात्याला पुरवतो. अनेक कंपन्या ही माहिती विकत घेऊन तिचा उपयोगही करतात. थोडक्यात आपल्या कळत-नकळत आपल्या जगण्याचे एकप्रकारे डाटाफिकेशन होण्याचा ट्रेण्ड वाढतोय.

Web Title:  On the threshold of a new change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.