टेकफेस्टमध्ये रंगणार काउंटर स्ट्राइकसह पबजीचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 06:06 AM2019-12-20T06:06:57+5:302019-12-20T06:07:14+5:30
करिअरसाठी मिळालेली उत्तम संधी म्हणून स्पर्धेकडे पाहा; तंत्रवेड्या तरुणाईला आयआयटी मुंबईचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पबजी म्हटले की हल्ली केवळ तरुणाईला अॅडिक्ट करणारा गेम अशीच याची जगभर ओळख झाली आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अॅक्शनमुळे तरुणाईला या गेमची भुरळ पडली आहे. मात्र केवळ गेमिंगच्या पलीकडे जाऊन यामध्ये करिअर संधी आणि पैसे कमावण्याची संधी असा पर्यायही यामधून उपलब्ध होतो याची जाणीव तरुणाईला करून देण्यासाठी यंदा आयआयटीच्या टेकफेस्ट आयोजकांनीच थेट याची स्पर्धा टेकवेड्या तरुणांसाठी आयोजित केली आहे. त्यामुळे यंदाच्या टेकफेस्टमध्ये काउंटर स्ट्राइकसह पबजीचा थरार पाहायला मिळेल.
स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि पबजीसारख्या गेमिंग अॅपमधूनही करिअर संधी हा मेळ साधण्याचा प्रयत्न टेकफेस्टचा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
आशियातील सर्वांत मोठा विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत होणार आहे. यंदाचा टेकफेस्ट तरुणाईसाठी अधिक जवळचा ठरणार आहे; कारण या फेस्टच्या ‘गेमर्स लीग’मध्ये लोकप्रिय ‘पबजी’बरोबरच गेल्या काही वर्षांपासून सीएस गो (काउंटर स्ट्राइक) खेळणाऱ्यांचा सामना रंगणार आहे. दोन्ही खेळांतील विजेत्यांना दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार असून हे खेळ खेळणारे कुणीही संघ यात सहभागी होऊ शकतील. आतापर्यंत प्रत्येकी ४ जणांच्या २५६ टीम्सने या पबजी मोबाइल ई-स्पोटर््स कॉम्पिटिशनमध्ये नोंदणी केल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सुरुवातीला पबजीसाठी नोंदणी करणाºया संघांचे आपापसांत सामने झाले. त्यानंतर आता त्यातील सर्वोत्तम १६ संघांचे ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत टेकफेस्टमध्ये सामने होणार आहेत.
देशांत विशेषत: बाहेरच्या देशांतही तरुणाईला या गेम्सने भुरळ पाडली आहे; मात्र या गेम्सकडे इतर देशांतील तरुणाई करिअरची उत्तम संधी म्हणून पाहत त्याचा वापर करीत आहे. तोच धडा येथील तंत्रवेड्या तरुणाईने गिरवून करिअरचा एक उत्तम पर्याय म्हणून या गेम्सकडे पाहावे हा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे ई-स्पोर्ट्स विभागाचे प्रमुख प्रतीक मोहनानी यांनी स्पष्ट केले.
असे आहेत स्पर्धेमध्ये खेळवण्यात येणारे गेम
च्‘प्लेअर अननोन बॅटलग्राउंड्स’ म्हणजेच पबजी हा खेळ दक्षिण कोरियाई व्हिडीओ गेम कंपनीने तयार केला आहे. ‘बॅटल रॉयल’ या २००० साली गाजलेल्या जपानी चित्रपटापासून प्रेरणा घेऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
च्‘काउंटर-स्ट्राइक : ग्लोबल आॅफेंसिव’ म्हणजेच ‘सीएस गो’ या खेळात दहशतवादविरोधी, दहशतवादी, असे दोन गट असतात. दहशतवाद्यांनी ठेवलेले बॉम्ब निकामी करणे, ओलीस ठेवलेल्या माणसांना सोडवणे असे कार्य दहशतवाद विरोधकांना या खेळात करायचे असते. हे दोन्ही गेम स्पर्धेत आहेत.