1GB रॅमसह आलं मिल्ट्री ग्रेड Smartwatch; सिंगल चार्जवर 45 दिवसांचा बॅकअप
By सिद्धेश जाधव | Published: April 9, 2022 12:37 PM2022-04-09T12:37:10+5:302022-04-09T12:37:31+5:30
TicWatch Pro 3 Ultra GPS भारतात SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर, 1GB रॅम आणि क्वॉलकॉम प्रोसेसरसह लाँच झालं आहे.
TicWatch Pro 3 Ultra GPS नावाचं मिल्ट्री ग्रेड स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आलं आहे. यात कंपनीनं 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडे दिलसे आहेत. यातील एनएफसीच्या फिचरच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टवॉचवरूनच पेमेंट करू शकता. हे वॉच सिंगल चार्ज वर 45 दिवस पर्यंतचा बॅटरी बॅकअप देऊ शकतं, असा दावा कंपनीनं केला आहे.
TicWatch Pro 3 Ultra GPS चे स्पेसिफिकेशन्स
TicWatch Pro 3 Ultra GPS स्मार्टवॉचमध्ये 1.4 इंचाचा AMOLED FSTN डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अल्वेज ऑन डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला अँटी फिंगरप्रिंट कव्हर ग्लासच्या सुरक्षेसह देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 454×454 पिक्सल आहे. याची डिजाईन MIL-STD-810G मिल्ट्री ग्रेड आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे.
हे वॉच गुगलच्या वियरबेल ऑपरेटिंग सिस्टम अर्थात Wear OS 2.6 वर चालतं. स्मार्टवॉच असून देखील यात 1GB रॅम देण्यात आला आहे, तसेच 8GB स्टोरेज देखील मिळते. प्रोसेसिंगसती Qualcomm Snapdragon Wear 4100 आणि Mobvoi ड्युअल-प्रोसेसर मिळतो. यात 100 पेक्षा जास्त वर्कआउट मोड, हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 सेन्सर असे हेल्थ फीचर्स मिळतात. यातील 577mAh ची बॅटरी सिंगल चार्ज वर 45 दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ देऊ शकते.
किंमत
TicWatch Pro 3 Ultra GPS स्मार्टवॉच भारतात शॅडो ब्लॅक या एकाच कलर व्हेरिएंटमध्ये आलं आहे. या वाची किंमत 29,999 रूपये ठेवण्यात आली आहे. हे तुम्ही Amazon वरून च्या माध्यमातून विकत घेऊ शकता.