Best Of 2021: 2021 मध्ये ‘या’ वादग्रस्त अॅपचा होता जलवा; कँडी क्रश गेमचा गोडवा अजूनही कायम, पाहा टॉप 10 अॅपची यादी
By सिद्धेश जाधव | Published: December 31, 2021 01:00 PM2021-12-31T13:00:50+5:302021-12-31T13:06:30+5:30
Best Of 2021: जगभरात 2021 मध्ये सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या अॅप्सची यादी समोर आली आहे. ही यादी Apptopia नं प्रकाशित केली आहे.
चिनी शॉर्ट व्हिडीओ अॅप TikTok वर भारत सरकारनं बंदी घातली आहे. परंतु जगभरात मात्र अजूनही या अॅपची जादू कायम आहे. युट्युब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स येऊनही शॉर्ट व्हिडीओजसाठी टिकटॉकला पसंती दिली जात आहे, याचा खुलासा Apptopia च्या एका रिपोर्टमधून झाला आहे. TikTok साल 2021 मध्ये जगातील सर्वात जास्त डाउनलोड झालेला मोबाईल अॅप बनलं आहे.
TikTok नं साल 2021 मध्ये जागतिक पातळीवर इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि टेलीग्राम अशा लोकप्रिय अॅप्सना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. इंटरटेनमेंट मध्ये Netflix, शॉपिंग कॅटेगरीमध्ये Shopee, ट्रॅव्हल अॅप्सच्या लिस्टमध्ये Google Maps सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेलं अॅप आहे. म्यूजिक अँड ऑडियो कॅटेगरीमध्ये Spotify पहिल्या क्रमांकावर आहे. गेम्समध्ये सब वे सर्फर पहिल्या क्रमांकावर आहे तर कँडी क्रशनं देखील टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे. अशी माहिती Apptopia की च्या रिपोर्टमधून मिळाली आहे.
2021 मध्ये जगात सर्वात जास्त डाउनलोड होणारे टॉप-10 सोशल मीडिया अॅप
- TikTok (656 दशलक्ष)
- Instagram (545 दशलक्ष)
- Facebook (416 दशलक्ष)
- WhatsApp (395 दशलक्ष)
- Telegram (329 दशलक्ष)
- Snapchat (327 दशलक्ष)
- Zoom (300 दशलक्ष)
- Spotify (203 दशलक्ष)
- Subway Surfer (191 दशलक्ष)
- Rolox (182 दशलक्ष)
2021 मध्ये जगात सर्वात जास्त डाउनलोड झालेले टॉप-10 मोबाइलला गेम्स
- Subway Surfer (191 दशलक्ष)
- Bridge Race (169 दशलक्ष)
- Bridge Race (169 दशलक्ष)
- Garena Free Fire (154 दशलक्ष)
- Among Us (152 दशलक्ष)
- Hair Challenge (138 दशलक्ष)
- Joine Cash (136 दशलक्ष)
- 8 Ball Pool (130 दशलक्ष)
- Ludo King (125 दशलक्ष)
- Candy Crush Saga (119 दशलक्ष)
हे देखील वाचा:
आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone
Alexa पासून मुलांना सांभाळा! असे चॅलेंज दिले की मुलीला विजेचा शॉक बसणार होता, पण...