हार्ट रेट सेन्सरसह Timex Helix Smart 2.0 स्मार्टवॉच लाँच; मिळणार 9 दिवसांचा बॅटरी बॅकअप 

By सिद्धेश जाधव | Published: July 15, 2021 12:31 PM2021-07-15T12:31:15+5:302021-07-15T12:31:40+5:30

Timex Helix Smart 2.0 Launch: Timex Helix Smart 2.0 मध्ये 10 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत, या वॉचची किंमत फक्त 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  

Timex Helix Smart 2.0 smartwatch launch with heart rate sensor; Get 9 days battery backup | हार्ट रेट सेन्सरसह Timex Helix Smart 2.0 स्मार्टवॉच लाँच; मिळणार 9 दिवसांचा बॅटरी बॅकअप 

हार्ट रेट सेन्सरसह Timex Helix Smart 2.0 स्मार्टवॉच लाँच; मिळणार 9 दिवसांचा बॅटरी बॅकअप 

Next

Timex ने नवीन स्मार्टवॉच Timex Helix Smart 2.0 नावाने भारतात लाँच केली आहे. 10 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडसह ग्राहकांना या वॉचसोबत DocOnline चे एक महिन्याचे सब्स्क्रिप्शन मोफत मिळत आहे. या वॉचमध्ये टेम्परेचर सेन्सर आणि हार्ट रेट सेन्सर देण्यात आला आहे. 9 दिवसांचा बॅटरी लाईफ देणाऱ्या या स्मार्टवॉचची किंमत देखील खूप कमी ठेवण्यात आली आहे.  

Timex Helix Smart 2.0 चे स्पेसीफाकेशन्स 

Timex Helix Smart 2.0 स्मार्टवॉचमध्ये 1.55 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेच्या बाजूला फिजिकल बटण आहे. हा स्मार्टवॉच सतत शरीराचे तापमान मापतो तसेच हृदयाचे स्पंदनांची नोंद ठेवतो. हा वॉच फक्त 3 तासांमध्ये फुलचार्ज होऊन अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये 9 दिवस तर स्टॅन्डबाय मोडमध्ये 15 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. Timex Helix Smart 2.0 मध्ये ट्रेडमिल, बास्केटबॉल, योगा, फुटबॉल, बॅडमिंटन आणि स्किपिंग सह 10 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत. यात IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स देण्यात आला आहे.  

Timex Helix Smart 2.0 ची किंमत  

Timex Helix Smart 2.0 स्मार्टवॉच भारतात 3,999 रुपयांमध्ये Amazon च्या माध्यमातून उपलब्ध होईल. हा डिवाइस 26 जुलै आणि 27 जुलैला आयोजित Amazon Prime Day Sale मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या Timex स्मार्टवॉचसोबत DocOnline चे एका महिन्याचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.

Web Title: Timex Helix Smart 2.0 smartwatch launch with heart rate sensor; Get 9 days battery backup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.