व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार, 'ही' आहे ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:04 PM2018-11-15T12:04:04+5:302018-11-15T12:43:09+5:30
व्हॉट्सअॅपवरील काही मेसेज हे कधी कधी आपण वाचण्याआधीच डिलीट केलेले असतात. युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. एका ट्रिकच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार आहेत.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं लोकप्रिय मेसेजिंग अॅप असून ते नेहमीच युजर्सना नवनवीन फीचर्स देत असतं. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने लोकांना पाठवलेले मेसेज डिलीट करता येईल यासाठी एक खास फीचर आणलं होतं. Delete for everyone या फीचरच्या माध्यमातून सेंडर आणि रिसीव्हर या दोघांकडून मेसेज डिलीट केला जातो. मात्र व्हॉट्सअॅपवरील काही मेसेज हे कधी कधी आपण वाचण्याआधीच डिलीट केलेले असतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. एका ट्रिकच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार आहेत. या ट्रिकबाबत जाणून घेऊया.
Delete for everyone या फीचरमध्ये व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज पाठवल्यानंतर जवळपास 1.30 तासाच्या आत तो मेसेज डिलीट करता येतो. त्यानंतर मेसेज डिलीट केल्यास तो तसाच राहतो. मात्र आता ट्रिकच्या मदतीने डिलीट केलेले मेसेज युजर्सना वाचता येणार आहेत. यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवरून Notification History हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. जर व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज आला तर या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला त्याबाबत नोटीफिकेशन मिळेल. लॉग फॉर्मेटमध्ये हे मेसेज दिसतील. मात्र यासाठी सुरुवातीला सेटींगमध्ये जाऊन अक्सेस देण्याची गरज आहे.
लॉगवर क्लिक करून तुम्ही तो मेसेज वाचू शकता. मात्र जर मेसेज खूपच मोठा असेल तर तो पूर्ण दिसणार नाही. मोठा मेसेज दिसला नाही तरी त्याचा विषय मात्र यामुळे समजू शकणार आहे. व्हॉट्सअॅपवर कधी कधी एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवला जातो. मात्र थोड्यावेळाने काही कारणास्तव तो डिलीट केला जातो. त्यावेळी तो मेसेज काय असेल याबाबत अनेकांना उत्सुकता असते. त्यामुळेच जर तुमच्या एखाद्या मित्राने अथवा मैत्रिणीने पाठवून डिलीट केलेला मेसेज वाचायचा असल्यास याचा खूप फायदा होणार आहे.