Tips and Tricks: विना चॅट उघडता असे वाचा Whatsapp मेसेज; कमालीची ट्रिक येईल कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:37 PM2021-01-25T18:37:30+5:302021-01-25T18:38:41+5:30
वाचा कसे पाहाल हे मेसेज
Whatsapp Tips and Tricks: एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आपण अनेक मेसेजिंग अॅप्सचा वापर करत असतो. अनेकदा आपण मेसेज वाचलेत की नाही हे समोरच्याला कळू नये आपल्याला वाटत असतं. तर आपण आज Whatsapp बाबत एका ट्रिकची माहिती घेणार आहोत. या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही समोरच्याला कोणते मेसेज वाचलेत किंवा नाही हे समजणार नाही.
तुम्हाला सुरूवातील तुमच्या मोबाईलमध्ये WhatsApp Web सर्च करावं लागेल आणि त्याद्वारे WhatsApp कनेक्ट करावं लागेल. जर तुम्हाला ही प्रक्रिया कशी करतात हे माहित नसेल तर प्रथम तुम्हाला WhatsApp Web वर गेल्यानंतर एक क्युआर कोड दिसेल. तो कोड स्कॅन करण्यासाठई स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करा. त्यानंतर त्यावर दिसणाऱ्या तीन डॉट्स मेन्यूवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला WhatsApp Web हा पर्याय निवडावा लागेल.
क्लिक केल्यानंतर WhatsApp Web मध्ये दिसणारा क्युआर कोड स्मार्टफोनवर स्कॅन करावा लागेल. कोड स्कॅन झाल्यानंतर तुमचं WhatsApp अकाऊंट तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर उघडेल.
अकाऊंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला कोणाचा मेसेज आला असेल तर तुम्ही चॅट ओपन न करताच तो वाचू शकता. केवळ त्या व्यक्तीच्या नावावर तुम्हाला कर्सर न्यावा लागेल. जसं तुम्ही त्या कर्सरच्या वर जाल तुम्हाला त्या वेळचा लेटेस्ट मेसेज दिसेल आणि तुम्ही चॅट ओपन न करता तो वाचू शकाल. WhatsApp आपल्या मोबाईलमध्ये वापरणाऱ्या युझर्सना मोबाईलमधील नोटिफिकेशन बारमध्येही आपले मेसेज सहजरित्या वाचता येतात.