Spam Calls आणि मेसेजेसपासून होणार सुटका, ‘ट्राय’ तयार करतेय नवी व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 10:04 PM2022-11-29T22:04:45+5:302022-11-29T22:05:04+5:30
ट्राय एका व्यवस्थेवर काम करत असून यामुळे फसवणुकीलाही बसणार आळा.
आपण ट्रायच्या (Telecom Regulatory Authority of India) कॉलर आयडी अॅपबद्दल अनेकदा ऐकले आहे. आता प्राधिकरणाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. सोमवारी, ट्रायने सांगितले की ते अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत, जे त्रासदायक कॉल आणि एसएमएस डिटेक्ट शकतात.
एवढेच नव्हे तर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी प्राधिकरण एका जॉईंट ॲक्शन प्लॅनवरही काम करत आहे. ट्रायने म्हटले आहे की UCC (अनसोलिसीटेड कमर्शियल कम्युनिकेशन) किंवा पेस्की कम्युनिकेशन हे लोकांच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे. प्राधिकरणाने हे लोकांच्या प्रायव्हसीवर अतिक्रमण मानले आहे.
ट्रायची योजना काय?
ट्रायने म्हटले आहे की, 'नोंदणीशिवाय टेलिमार्केटिंग कॉल करणाऱ्यांविरोधात आता तक्रारी दाखल केल्या जात आहेत. दुसरीकडे, यूसीसी एसएमएसच्या प्रकरणांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. UCC कॉल ही देखील एक मोठी समस्या आहे. अत्यावश्यक बाबींमध्ये UCC डिटेक्शन सिस्टीम, डिजिटल कॉन्स्टंट ऍक्विझिशनची तरतूद, हेडर आणि मेसेज टेम्प्लेट्स, इंटेलिजेंस स्क्रबिंग, AI आणि मशीन लर्निंग यांचा समावेश आहे.
पेस्की कॉल आणि एसएमएस थांबवण्यासाठी, TRAI ने टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन 2018 जारी केले आहे. या अंतर्गत, ब्लॉकचेनवर आधारित एक इकोसिस्टम तयार केली जाईल. TRAI पूर्णपणे नवीन प्रणालीवर काम करत आहे, जेणेकरून मार्केटिंग कॉल्समध्ये घट करता येईल. यासोबतच एसएमएस आणि कॉलवर होणारी फसवणूक थांबवता येईल.
नवीन नियमांनुसार, सर्व कमर्शिअल प्रमोटर्स आणि टेलीमार्केटर यांना DLT प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागेल. याशिवाय प्रमोशनल मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांच्या प्रेफरन्सला पाहावं लागेल. या फ्रेमवर्क अंतर्गत, 2.5 लाख प्रिन्सिपलची नोंदणी करण्यात आली आहे, ज्यात 6 लाखांहून अधिक हेडर्स आणि सुमारे 55 लाख मेलेज टेम्पलेट्स आहेत. ट्रायच्या म्हणण्यानुसार, या फ्रेमवर्कनंतर ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. तथापि, लोक अजूनही नोंदणीकृत नसलेल्या त्रासदायक कॉलमुळे त्रस्त आहेत. हे कॉल्स बंद करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.