आता टॉयलेट सीट सांगणार तुम्हाला डायबिटीज किंवा कॅन्सर आहे की नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 10:19 AM2018-12-18T10:19:33+5:302018-12-18T10:20:39+5:30
बहुदा टॉयलेट सीटचा वापर कशासाठी केला जातो हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. त्यामुळे टॉयलेट सीटच्या माध्यमातून काही गंभीर आजारांची माहिती मिळवता येईल, असा कुणी विचारही केला नसेल.
बहुदा टॉयलेट सीटचा वापर कशासाठी केला जातो हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. त्यामुळे टॉयलेट सीटच्या माध्यमातून काही गंभीर आजारांची माहिती मिळवता येईल, असा कुणी विचारही केला नसेल. पण अशी एक टॉयलेट सीट तयार करण्यात आली. संशोधकांनी एक अशी हायटेक टॉयलेट सीट तयार केली आहे ज्याद्वारे डायबिटीज आणि कॅन्सरची माहिती मिळवण्यास मदत करते. इतकेच नाही तर या आजारांची लक्षणे दिसताच ती अलर्टही करते.
फिटलू असं या टॉयलेट सीटला नाव देण्यात आलं असून ही स्मार्ट टॉयलेट सीट यूरोपियन स्पेस एजन्सी आणि मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने मिळून तयार केली आहे. ही स्मार्ट टॉयलेट सीट मोबाइलशी जोडली गेली आहे. टॉयलेटमध्ये लावण्यात आलेले सेन्सर यूरिनच्या मदतीने आजारांची माहिती घेतात. यूरिनमध्ये प्रोटीन आणि ग्लूकोजचा स्तर प्रमाणापेक्षा अधिक असेल तर सेन्सर मोबाइलवर अलर्टही पाठवतात.
टॉयलेच सीट तयार करण्यासाठी कंपनीचा शोध
सध्या अंतराळवीर या टॉयलेटचा वापर स्पेसक्राफ्ट म्हणजेच अंतराळात करत आहेत. याला तिथे यूरिन मॉनिटरींग सिस्टीमच्या नावाने ओळखले जाते. हे स्मार्ट टॉयलेट लवकर सर्वसामान्य लोकांसाठीही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यूरोपियन स्पेस एजन्सी आणि मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सध्या एका अशा कंपनीच्या शोधात आहे जी या तंत्रज्ञानाचा वापर करुन अशा टॉयलेट सीट तयार करेल.
यूरोपियन स्पेस एजन्सीचे सॅनिटेशन प्रोजेक्ट मॅनेजर डेविड कोप्पोला यांच्यानुसार, आम्ही स्वच्छतेचा प्रोत्साहन देण्यासाठी डेटा आणि स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या शक्यतांचा शोध घेत आहोत. तर प्रोजेक्टचे प्रमुख मायकल म्हणाले की, शरीरात काय बदल होतात याकडे जास्तीत जास्त लोक लक्षच देत नाहीत. पण आता फिटलू यावर लक्ष ठेवणार. हे यासाठी गरजेचं आहे कारण जास्तीत जास्त आरोग्य समस्यांसाठी यूरिन टेस्टच्या मदतीने ओळखले जाऊ शकते.
जर तुमच्याकडे १ हजार स्मार्ट टॉयलेट असतील तर एका मोठ्या क्षेत्रात लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवलं जाऊ शकतं. मशीनमध्ये प्रोगाम करण्यात आलेल्या डेटाच्या मदतीने आजार वाढण्याच्या धोक्याचीही माहिती मिळवली जाऊ शकते.
स्मार्ट टॉयलेटबाबत जपान पुढे
जपानमध्ये स्मार्ट टॉयलेट सहजपणे पाहिले जाऊ शकतात. कारण येथील लोक स्वच्छतेवर अधिक लक्ष देतात. त्यामुळे जपानी लोक टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी गरम पाणी, एअर ड्रायर आणि गरम सीट्सचा वापर करतात. काही जपानी टॉयलेट मॅन्यूफॅक्चर कंपन्या असे टॉयलेट तयार करत आहेत जे वाय-फायसोबत जुळले आहेत. हे मास इंडेक्स, प्रोटीन-शुगरची प्रमाण आणि यूरिन तापमानवर लक्ष ठेवतं.
यूरिन टेस्ट का गरजेची
यूरिन टेस्टच्या मदतीने ब्लॅडर कॅन्सर, किडनी आणि लिवरसंबंधी आजारांशिवाय संक्रमणाचीही माहिती मिळवली जाऊ शकते.