सुरक्षित नाहीत 1 लाख वेबसाईट्स! युजर्सचे पासवार्ड्सही चोरत आहेत लोकप्रिय साईट्स 

By सिद्धेश जाधव | Published: May 17, 2022 11:04 AM2022-05-17T11:04:31+5:302022-05-17T11:04:55+5:30

1 लाख टॉप वेबसाईट्स युजर्सची परवानगी न घेता त्यांची खाजगी माहिती चोरत आहेत.  

Top 1 Lakh Websites Collecting Personal Information Including Password Without Users Permission  | सुरक्षित नाहीत 1 लाख वेबसाईट्स! युजर्सचे पासवार्ड्सही चोरत आहेत लोकप्रिय साईट्स 

सुरक्षित नाहीत 1 लाख वेबसाईट्स! युजर्सचे पासवार्ड्सही चोरत आहेत लोकप्रिय साईट्स 

Next

डिजिटल विश्व जितकं आयुष्य आरामदायी करतं परंतु या विश्वात सुरक्षा देखील तितकीच कमकुवत असते. एका क्लीकमध्ये जगभरची माहिती मिळते, तर त्यासाठी तेवढीच खाजगी माहिती द्यावी लागते. ही माहिती आपल्या न कळत वेबसाईट्स किंवा अ‍ॅप घेत असतात. आता तर हे एका संशोधनातून सिद्ध झालं आहे की, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 1 लाख वेबसाईट्स युजर्सचा डेटा गोळा करत आहेत.  

यातील अनेक अशा वेबसाईट्स आहेत, ज्या युजरच्या परवानगीविना पासवर्ड कलेक्ट करत आहेत. इतकेच नव्हे तर मोठ्याप्रमाणावर वेबसाईट्स युजरचा ई-मेल आयडी इत्यादी माहिती देखील युजरच्या मर्जीविना साठवतात. रिसर्चनुसार, या वेबसाईट्समध्ये मार्केटिंगसाठी इंटिग्रेट करण्यात आलेल्या थर्ड पार्टी ट्रॅकर्समुळे युजर डेटा कलेक्ट केला जातो.  

संशोधनातून झाला खुलासा  

Radbound University आणि University of Lausane यांनी टॉप वेबसाईट्सचा अभ्यास केला आहे, त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोप आणि अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या लोकेशनवरील क्राउलिंग के विश्लेषणाच्या आधारावर हे संशोधन करण्यात आलं आहे. यात युरोपीय यूनियनमधून अ‍ॅनलाइज करण्यात आलेल्या वेबसाईट्स पैकी 1,844 वेबसाईट युजरच्या परवानगीविना ई-मेल आयडी इत्यादी डेटा गोळा करत होत्या. तर US मधील 2,950 वेबसाईट्स डेटा चोरत होत्या. 

रिसर्चर्सनुसार, या वेबसाईटवर मोठ्याप्रमाणावर Meta आणि TikTok चे ट्रॅकर्स युजर डेटा कलेक्ट करत होते. तसेच 41 ट्रॅकर्स डोमेनद्वारे टॉप वेबसाईट्सच्या युजरचा डेटा गोळा केला जात होता. या वेबसाईट्स युजरच्या सबमिट बटनवर क्लिक करण्याआधीच डेटा घेत होत्या.  

काही वेबसाईट आपल्या डेटाबेसमध्ये ई-मेल आयडी आणि युजनेमची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा डेटा घेतात. अमेरिकेत USAToday, Business Insider, Fox News, Time आणि Trello सारख्या दहा वेबसाईट्स ई-मेल आयडी ट्रॅक करत होत्या. तर युरोपीय यूनियनमध्ये Independent, Shopify, Newsweek आणि Marriott डेटा गोल करत होत्या.  

पासवर्ड देखील नाही सुरक्षित  

52 वेबसाईट्सवर रशियातील Yandex सह अनेक थर्ड पार्टी वेबसाईट युजरच्या संमतीशिवाय पासवर्ड गोळा करत होत्या. यावर बंदी आणण्यासाठी आता Yandex नं अपडेट आणला आहे, आता डेटा कलेक्ट केला जाणार नाही.  अन्य ट्रेकर्सनं असा कोणताही अपडेट जारी केल्याची माहिती मिळाली नाही. 

Web Title: Top 1 Lakh Websites Collecting Personal Information Including Password Without Users Permission 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.