'हे' १० अंकी मोबाईल नंबर होणार बंद! Trai ने दिला आदेश, तुमचा नंबर आहे का?, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 02:07 PM2023-03-12T14:07:39+5:302023-03-12T14:09:38+5:30
ट्रायने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसापासून अनेकांना मार्केट कंपन्यांचे फोन येत आहेत. यामुळे अनेकांनी ट्रायकडे या संदर्भात तक्रारी केल्या आहेत, आता यावर ट्रायने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. टेलीमार्केटिंग कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रायने नवा नियम जारी केला आहे. त्यानुसार १० अंकी नोंदणी नसलेले मोबाईल क्रमांक येत्या ५ दिवसात बंद होतील. अनोंदणीकृत मोबाईल नंबरवरून कॉल करण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील ५ दिवसांत, १० अंकी प्रचारात्मक संदेश, जे प्रमोशनल कॉलिंगसाठी वापरले जातात, ते बंद केले जाणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मार्केटिंगचे येणार कॉल बंद होणार आहेत.
ट्रायने वापरकर्त्यांना त्रासदायक प्रमोशनल मेसेज आणि कॉल करण्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. '१० अंकी मोबाईल प्रमोशनसाठी वापरता येणार नाही. सामान्य कॉल्स आणि प्रमोशनल कॉल्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे नंबर जारी केले जातात. यामुळे सामान्य कॉल आणि जाहीरातीसाठी केलेले कॉल ओळखले जातात. काही टेलिकॉम कंपन्या नियमांच्या विरोधात १० अंकी मोबाइल नंबरवरून प्रचारात्मक संदेश आणि कॉल करत आहेत, असं एका अहवालात म्हटले आहे. ट्रायच्या नव्या आदेशानुसार, सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांना ५ दिवसांत नियम लागू करावे लागतील. यानंतर, नियमांचे उल्लंघन केलेले दिसल्यास जाहीरातीसाठी कॉल करणारा १० अंकी क्रमांक ५ दिवसांच्या आत बंद केला जाईल.
'टेक'मत: मोबाइलमध्ये हे ॲप ठेवा, पश्चात्तापाची वेळच येणार नाही
जर तुम्ही प्रमोशनल कॉलिंगसाठी १० अंकी मोबाइल नंबर वापरत असाल, तर असे करणे नियमांचे उल्लंघन आहे, आता इतून पुढे हे नंबर वापरता येणार नाहीत. अन्यथा पुढील ५ दिवसांत तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक केला जाईल. टेलीमार्केटिंग कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या वापरकर्त्यांनी वैयक्तिक मोबाइल नंबरवरून कॉल करू नयेत, असा सल्ला दिला जातो. त्याऐवजी, वापरकर्त्यांनी कंपनीच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून जाहीरातीसाठी कॉलिंग करावे. १० अंकी नंबर विना नोंदणीकृत वापरल्यास तो पुढील ५ दिवस बंद केली जाणार आहे.
वापरकर्त्यांनी गेल्या काही दिवसापासून या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. आता ट्राय या संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बँक, तसेच मार्केटमधील काही प्रोडक्ट मार्केटींगसाठी या कॉलचा वापर करत आहेत. वापरकर्त्यांना कधीही फोन करुन डिस्टर्ब केले जात आहे. यावर आता हा मोठा निर्णय ट्रायने घेतला आहे.