कमी होऊ शकतं आपलं DTH बिल, नव्या नियमांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 03:23 PM2019-05-21T15:23:48+5:302019-05-21T15:24:11+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वी DTH सेक्टरशी संबंधित बातम्या येत आहेत.

trai may lower dth tariff new rule | कमी होऊ शकतं आपलं DTH बिल, नव्या नियमांची तयारी

कमी होऊ शकतं आपलं DTH बिल, नव्या नियमांची तयारी

Next

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून DTH सेक्टरशी संबंधित बातम्या येत आहेत. ज्यात डीटीएचचं बिल कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. TRAIचा हा नियम लागू झाला असून, आता चॅनेलच्या हिशेबानं पैसे द्यावे लागत आहेत. परंतु एका ताज्या रिपोर्टनुसार, डीटीएच बिल पहिल्यापेक्षा कमी होऊ शकते. ETच्या रिपोर्टनुसार, टेलिकॉम अँड ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटरी एक नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. ज्याचा उद्देश ग्राहकांना येणारं केबल आणि डीटीएचचं बिल कमी करण्याचा आहे.

ट्रायच्या नव्या पॉलिसीवर ग्राहक समाधानी नाहीत. ब्रॉडकास्टिंगचं टॅरिफ कमी करण्यासाठी आमचं काम सुरू आहे. त्यामुळे ते कमी करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील ते पाहावे लागेल. जर कोणताही नवा नियम आल्यास सध्याच्या नियमांत बदल करण्यात येणार आहे, असंही ट्रायच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. काही ब्रॉडकास्टर्सच्या मते, ट्रायला त्यांच्या टॅरिफमध्ये बदल करण्याचा अधिकार नाही.

परंतु तो अधिकार ट्रायकडे असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. परंतु नियमांमध्ये बदल करायचे की नाही ते सर्व बाजारावर निर्भर असल्याचंही ट्रायनं सांगितलं आहे. दुसरीकडे कुठल्याही चॅनेलला 19 रुपयांपेक्षा जास्त चार्ज करता येणार नाही. सध्या लागू असलेल्या नियमांनुसार अनेक युजर्सच्या मते त्यांचं बिल कमी झालं आहे. तर काही जण म्हणतात याचा काहीही फायदा झालेला नाही.  उलट टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढल्याचंही सांगत आहेत. 
 

Web Title: trai may lower dth tariff new rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :DTHडीटीएच