लय भारी! अवघ्या १ रुपयात विमानाचं तिकीट बूक करा, कसं ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 08:41 AM2022-11-26T08:41:20+5:302022-11-26T08:42:31+5:30

भारतात रेल्वे तिकीट बुक करणं अवघड काम आहे असं म्हटलं जातं. रेल्वे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना खूप प्रयत्न करावे लागतात.

trainman app giving air tickets for one rupees if train tickets not get confirmed | लय भारी! अवघ्या १ रुपयात विमानाचं तिकीट बूक करा, कसं ते जाणून घ्या...

लय भारी! अवघ्या १ रुपयात विमानाचं तिकीट बूक करा, कसं ते जाणून घ्या...

googlenewsNext

भारतात रेल्वे तिकीट बुक करणं अवघड काम आहे असं म्हटलं जातं. रेल्वे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना खूप प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर कुठं जाऊन कन्फर्म तिकीट मिळतं. अनेकदा तर प्रवाशांना वेटिंगवरच राहावं लागतं. तर काहींना कन्फर्म तिकीट मिळूनही जागा मिळत नसल्यानं शेवटच्या क्षणाला त्रासाला सामोरं जावं लागतंच. हा सगळा व्याप लक्षात घेता तिकीट बुकिंग अ‍ॅप ट्रेनमॅनने एक नवीन फीचर आणलं आहे. यामध्ये प्रवाशांना रेल्वेच्या कन्फर्म तिकिटाची हमी दिली जात आहे. महत्वाची बाब अशी की जर तुमचं ट्रेनचं तिकीट कन्फर्म झालं नाही तर कंपनी तुम्हाला प्रवास करण्यासाठी थेट विमानाचं तिकीट देईल.

कसं काम करतं हे फिचर?
ट्रेनमॅन अ‍ॅपने ट्रिप अ‍ॅश्युरन्स नावाचं नवीन फीचर लाँच केलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीनं वेटिंग लिस्टमध्ये असलेले रेल्वे प्रवासी आपला प्रवास पूर्ण करू शकतील. या अ‍ॅपद्वारे कोणीही रेल्वे तिकीट बुक करतो तो अ‍ॅपमध्येच त्याच्या तिकिटाची सद्यस्थिती पाहू शकतो. प्रवाशाला कन्फर्म तिकीट न मिळाल्यास तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता कितपत आहे याची माहिती अ‍ॅप देईल. चार्ट तयार करण्यापूर्वी तुमचे तिकीट कन्फर्म न झाल्यास, ट्रिप अ‍ॅश्युरन्स फीचरच्या मदतीनं प्रवासी शेवटच्या क्षणी हवाई तिकीट बुक करू शकतात.

अ‍ॅपमध्ये प्रवाशाचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता ९० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं दाखवत असेल तर अ‍ॅप १ रुपये ट्रीप अ‍ॅश्युरन्स शुल्क आकारेल. जर ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर कंपनी तिकीटाच्या वर्गानुसार नाममात्र शुल्क आकारेल. यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चार्ट तयार करताना ट्रेनचं तिकीट कन्फर्म झाल्यास ट्रिप अ‍ॅश्युरन्स फी परत केली जाईल. मात्र, तिकीट कन्फर्म न झाल्यास, प्रवाशाला प्रवास पूर्ण करण्यासाठी मोफत विमान तिकीट देईल.

या रेल्वे गाड्यांसाठी सुविधा उपलब्ध होणार
हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे की ट्रिप अ‍ॅश्युरन्सचे हे वैशिष्ट्य सध्या सर्व IRCTC राजधानी ट्रेन आणि सुमारे १३० इतर ट्रेनसाठी उपलब्ध आहे. कंपनीच्या मते, ट्रेनमॅन अ‍ॅप मशीन लर्निंग सारख्या नवीन युगातील तंत्रज्ञानाचा वापर करतं आणि ते IRCTC चे अधिकृत भागीदार आहे. प्रवाशांना त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ट्रिप अ‍ॅश्युरन्सचं फिचर सुरू करण्यात आलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, कंपनीचा दावा आहे की वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वर्तवण्यात ९० टक्के अचूक आहे. पण, तिकीट कन्फर्म न झाल्यास कंपनी त्या व्यक्तीला मोफत विमान तिकीट देईल. पण ट्रिप अ‍ॅश्युरन्सची ही सुविधा ज्या शहरांमध्ये विमानतळ आहेत त्यांनाच लागू असेल.

(टीप: १ रुपयाच्या फ्लाइट तिकिटांची ही माहिती मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे देण्यात आली आहे. या अ‍ॅपद्वारे बुकिंग करण्यापूर्वी, स्वतः तपशील तपासा आणि स्वतःच्या जबाबदारीवर बुक करा.)

Web Title: trainman app giving air tickets for one rupees if train tickets not get confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.