स्मार्टफोन घ्यायचाय?; ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह १० हजारांपर्यंतचे हे असू शकतात 'बेस्ट' ऑप्शन

By जयदीप दाभोळकर | Published: January 22, 2021 12:55 PM2021-01-22T12:55:59+5:302021-01-22T12:57:22+5:30

पाहा कोणते आहेत हे फोन आणि किती मिळू शकतं डिस्काऊंट

triple rear camera phone under 10000 best options know offers on amazon and flipkar | स्मार्टफोन घ्यायचाय?; ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह १० हजारांपर्यंतचे हे असू शकतात 'बेस्ट' ऑप्शन

स्मार्टफोन घ्यायचाय?; ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह १० हजारांपर्यंतचे हे असू शकतात 'बेस्ट' ऑप्शन

Next
ठळक मुद्देपाहा कोणते आहेत हे स्मार्टफोन्सअनेक स्मार्टफोन्सवर मिळणार मोठा डिस्काऊंट

आजकाल आपण स्मार्टफोन खरेदी करताना सर्वच बाजूंचा विचार करत असतो. मग त्यात फोनची बॅटरी असते, डिस्प्ले, तो फोन 4G आहे 5G नाहीतर त्याचा कॅमेरा आणि गेमिंग परफॉर्मन्स. अनेकाना फोटोग्राफीची आवड असते. अशातच अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना त्यांचा कल हा त्याच्या कॅमेऱ्यावर असतो. अधिक मेगापिक्सेल असलेल्या कॅमेऱ्यांकडेही अनेकांचा कल दिसून येतो.

आज आपण १० हजार रूपयांपर्यंतचे फोन पाहणार आहोत. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये कोणती ऑफर मिळत आहे हेदेखील आपण पाहणार आहोत. 

Realme Narzo 20A



या स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ८,४९९ रूपये आहे. परंतु या स्मार्टफोनची खरी किंमत १०,९९९ रूपये इतकी आहे. २,५०० रूपयांच्या डिस्काऊंटसह हा फोन खरेदी करता येऊ सकतो. यासोबतच ग्राहकांना ७,९५० रूपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात येत आहे. सध्या ही ऑफर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १२ मेगापिक्सेल, दुसरा आणि तिसरा कॅमेरा सेन्सर २ मेगापिक्सेलचा आहे. तर यामध्ये ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

Poco C3



हा फोनदेखील ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी व्हेरिअंटसह येतो. याची किंमत ९,९९९ रूपये इतकी आहे. तसंच या स्मार्टफोनवर ३ हजार रूपयांचा फ्लॅट डिस्काऊंटही देण्यात येत आहे. त्यामुळे हा फोन ६,९९९ रूपयांत खरेदी करता येऊ शकतो. यासोबत ६,४९० रूपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात येत आहे. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच यामध्ये दुसरा आणि तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. 

Realme C12



या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आलं असून या व्हेरिअंटची किंमत ८,४९९ रूपये इतकी आहे. या स्मार्टफोनची खरी किंमत १०,९९९ रूपये इतकी आहे. २,५०० रूपयांच्या डिस्काऊंटसह हा स्मार्टफोन खरेदी करता येऊ शळकतो. सध्या फ्लिपकार्टवर हा फोन उपलब्ध असून या स्मार्टफोनमध्येही ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा असून २ मेगापिक्सेलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. तसंच सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे. 

OPPO A15



हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर उपलब्ध असून हा ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह येतो. याची किंमत १२,९९० रूपये इतकी आहे. परंतु हा फोन ३ हजार रूपयांच्या डिस्काऊंटसह ९,९९० रूपयांना विकत घेता येऊ शकतो. तसंच यासोबत ९,४०० रूपयांची एक्सचेंज ऑफरही मिळते. यामध्येदेखील ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा असून अन्य दोन कॅमेरे हे २ मेगापिक्सेलचे आहेत. 

Samsung Galaxy M02s 



हा फोनदेखील तुम्हाला अॅमेझॉनवरून खरेदी करता येऊ शकतो. यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची किंमत १०,४९९ रूपये इतकी असून यावर १,८०० रूपयांचा डिस्काऊंटही देण्यात येत आहे. हा फोनसह ८,२५० रूपयांची एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. या स्मार्टफोनमध्येदेखील ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं असून यातील मुख्य कॅमेरा हा १३ मेगापिक्सेलचा आहे आणि अन्य दोन कॅमेरे हे २ मेगापिक्सेलचे आहेत. तर या फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. 

Web Title: triple rear camera phone under 10000 best options know offers on amazon and flipkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.